अहमदनगर | नगर सह्याद्री
अमेरिकेतील व इतर देशातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन संस्था यांच्यावतीने श्वसन प्रणालीमध्ये (एआरडीएस)वर उपचारासाठी तसेच स्वाईन फ्लू वर प्रभावी उपचार यासाठी प्रतिथयश डॉ. दीपक एस.एस. यांना उत्कृष्ट संशोधन पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली येथे अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था व इतर देशातील संशोधन संस्था यांच्यावतीने उत्कृष्ट संशोधन करून श्वसन प्रणाली वर प्रभावी उपचार केल्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा लाभ होऊन ते पूर्णपणे बरे झाले. याची नोंद घेऊन उत्कृष्ट संशोधन पुरस्कार डॉ. दीपक यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी निवड समितीचे सदस्य डॉ. फारिहा (नेदेरलँड्स), डॉ. गलिसिए (मेसिको), डॉ. त्यिांसिओ (चीन), डॉ. जे. एस. कुमारी (श्रीलंका), डॉ. कॅरिअस (मोझांबिक), प्रा. शिझयुव (जपान) यांच्या उपस्थित व त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला या वेळी १७ विविध देशांचे डॉटर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगातील पहिल्यांदा रेणू चा वापर करून साईदीप हॉस्पिटल चे चेअरमन डॉ. दीपक यांनी (एआरडीएस) वर प्रभावी उपचार करून रुग्णांना जीवनदान दिले याची नोंद घेऊन अमेरिका येथील जागतिक संशोधन संस्थेने हा पुरस्कार प्रदान केला. ए आर डी एस या श्वसन विकारावर उपचार केल्याने अनेक रुग्ण या संशोधीत उपचार पद्धतीमुळे बरे झाले.
डॉ.दीपक यांनी यावेळी नेहमीची उपचार पद्धतीला संशोधित जोड दिल्यास उपचार पद्धती अधिक प्रभावी पणे काम करते. यामुळे रुग्णाला आराम मिळण्यासाठी सुरवात होते व जास्त दिवस हॉस्पिटल मध्ये राहावे लागत नाही. कोविड काळात या उत्कृष्ट उपचार पद्धती मुळे अनेकांचे जीव वाचवता आले असे सांगून पुरस्कार प्रदान केल्याबाबत संस्थेचे आभार मानले.