spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदार संघात 'हे' उमेदवार वेटिंगवर? तर 'यांना' उमेदवारी जाहीर?,...

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदार संघात ‘हे’ उमेदवार वेटिंगवर? तर ‘यांना’ उमेदवारी जाहीर?, पहा एका क्लिकवर

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजले आहे. आज पासून उमेदवारी आर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. उमेदवारी वरून अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मातबर इच्छुक नेते मंडळी वेट अँड वॉच भूमिका घेताना दिसत आहे.

भाजपचा पहिल्या यादीत महायुतीकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे. भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रतिभा पाचपुते, माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. तर महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटाच्या पहिल्या संभाव्य यादीत पाच जणांचा समावेश आहे.

पारनेरमधून राणी लंके, जामखेड- कर्जत मतदारसंघातून रोहित पवार, अकोल्यातून अमित भांगरे, पाथ्रडी मधून प्रतापराव ढाकणे तर राहुरी मतदार संघातून प्राजक्त तनपुरे यांची नावे समोर आली आहे. तर कॉग्रेस व शिवसेना, उद्धव ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवाराची यादी अद्याप समोर आली नाही. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील मातबर इच्छुक नेते मंडळी वेटिंगवर असल्याचे समोर यात आहे तर काही बंडखोरीच्या तयारीत आहे.

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ इच्छुक
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुतीकडून आमदार संग्राम जगताप यांचे नाव समोर येत आहे. तर महाविकास आघाडीमधून शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर हे देखील इच्छुक आहेत तर काँग्रेसने देखील दावा करत किरण काळे यांच्या उमेदवारीसाठी अर्ज घेतला आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघ
अकोले विधानसभा मतदारसंघत महायुतीकडून आमदार किरण लहामटे याचे नाव समोर येत असून राष्ट्रवादी (शरद पवार ) गटाने अमित भांगरे यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहे. आमदार मधुकर पिचड 1980 ते 2014 पर्यंत सलग सात वेळा अकोले मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. त्यानंतर 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना मतदारांनी आमदारकीची संधी दिली होती. आता पुन्हा ते काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघ
बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेला संगमनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार हे सर्वसृत आहे. तर महायुतीकडून माजी खासदार डॉ. सुजय विखे देखील इच्छुक आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघ
सलग सात वेळा विजय प्राप्त करणारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना महायुतीकडून शिर्डी विधानसभा मतदारसंघात पुन्हा उमेदारी जाहीर झाली आहे. तर महाविकास आघाडीकडून प्रभाताई घोगरे चर्चेत आहेत. तर राजेंद्र पिपाडा हे देखील वेट अँड वॉच भूमिका घेताना दिसत आहे.

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ
शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून सलग दोन वेळेस २०१४ आणि २०१९ ला सलग दोन वेळेस निवडून आलेल्या मोनिका राजळे यांना पुन्हा तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने संधी दिली आहे. त्यांच्यासमोर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रताप ढाकणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ
राज्यात लक्षवेधी असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघांमध्ये २०१९ प्रमाणे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांच्यात पुन्हा एकदा सामना होणार हे निश्चित झाले आहे. कर्जत जामखेड मधील होणारी पवार-शिंदे लढत ही राज्यातील लक्षवेधी ठरणार आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघ
राहुरी मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्यासमोर महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे आव्हान आहे. भारतीय जनता पक्ष सोबत नेहमीच असलेले चंद्रशेखर कदम आणि त्यांचे पुत्र सत्यजित कदम यांची मनधरणी पक्ष नेतृत्वाकडून केली जाईल आणि त्यांचं बंड शमवले जाईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ
श्रीगोंदा मतदार संघातून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना तब्येतीच्या कारणास्तव उमेदवारी न देता त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. मात्र प्रतिभा पाचपुते यांचे उमेदवारी कायम राहिल्यास त्यांच्यासम नागवडे कुटुंबाचे आव्हान हे मोठे असणार आहे. अनुराधा नागवडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून प्रवेश करून मशाल या चिन्हावर उमेदवारी करण्याची पूर्ण तयारी केली असल्याची देखील चर्चा आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ
सध्या श्रीरामपूर तालुक्यात कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विद्यमान आमदार लहू कानडे हे पहिले दावेदार असल्याचं समोर येते आहे. तर महायुतीकडून इच्छुकांनी गर्दी केली आहे. शिवसेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, भाजपचे नितीन उदमले, नितीन दिनकर सध्या वेट अँड वॉच भूमिका घेताना दिसत आहे.

नेवासा विधानसभा मतदारसंघ
शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचा नेवासा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मी उद्धव ठाकरेंसोबत असे म्हणत शंकरराव गडाख यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. तर भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. अहिल्यानगर जिल्ह्यातून पाच जणांना उमेदवारी दिली. परंतु नेवाशा मतदारसंघात भाजपचा माजी आमदार असताना देखील तिथं उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे या मतदार संघात कुणाल उमेदारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पारनेर विधानसभा मतदारसंघ
पारनेर-नगर मतदारसंघात विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या इच्छुक आहेत. त्याचे राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटाच्या पहिल्या संभाव्य यादीत नाव आले आहे. त्यामुळे त्याची उमेदवारी पक्की असल्याची चर्चा मतदार संघात आहे. चार दिवसापूर्वी अजित पवार यांनी मेळावा घेत निलेश लंके यांच्या विरोधात मोठे शक्ती प्रदर्शन केले. अजित पवार यांच्या व्यासपीठावर तब्बल चार जण इच्छुक होते. त्यामध्ये बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, माजी नगराध्यक्ष विजय औटी, माधवराव लामखडे हे व्यासपीठावर होते. त्यामुळे उमेदारी कुणाला मिळणार याकडे तालुक्याच्या नजरा लागल्या आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे ही पारंपारिक लढाई आहे, मात्र यावेळी मात्र दोघेही महायुतीत असल्याने उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळेयांनी आपली उमेदवारी गृहीत धरत निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी अद्यापही कुठलाही निर्णय घेतला नसून वेट अँड वॉच भूमिका घेताना दिसत आहे.

 

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिरसाटवाडी मतदान केंद्रावर काय घडलं?; काय म्हणाल्या आमदार मोनिकाताईं राजळे? वाचा सविस्तर..

पाथर्डी | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे...

अदानी अडचणीत; अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे....

CM पदाबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान; थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या...

विजयाचा कॉन्फिडन्स! निकालापूर्वीच आमदार जगताप यांचे झळकले बॅनर

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील 12 ही विधानसभा मतदारसंघात...