spot_img
अहमदनगरAccident News: जामखेड-सौताडा महामार्गावर भीषण अपघातात

Accident News: जामखेड-सौताडा महामार्गावर भीषण अपघातात

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री-
गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेले जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्ता एक पट्टी तयार तयार झाली आहे पण अरूंद पट्टी मध्ये दोन वाहने बसत नाहीत. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दि. २३ एप्रिल रोजी सकाळी मोटारसायकल व आयसर टेम्पो यांच्यात अपघातात झाला. अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खाजगी रुगणालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. रूपेश फक्कड नाईकनवरे ( वय ३५ रा. पाटोदा, जि. बीड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी: नाईकनवरे आपल्या दुचाकी क्रमांक ( एम. एच 14 सी. व्ही 8868 ) ने जामखेड वरून पाटोदा येथे जात असताना जामखेड कडे येणाऱ्या आयसर टेम्पो क्रमांक (एम. एच. 23. ए.यु.4179 ) ने जोरदार धडक दिली .यात मोटारसायकल चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच मोटारसायकल वरील नाईकनवरे गंभीर जखमी झाले आहे.जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने होत आहे.

काही ठिकाणी सिमेंट रस्त्याची एक पट्टी तयार झाली आहे. पण यावर दोन गाड्या बसत नाहीत. यामुळे या रस्त्यावर सतत अपघात होत आहेत. साकत फाटा ते नायरा पेट्रोल पंप या चारशे मीटर अंतरावर सहा महिन्यात अनेकवेळा अपघात झाले आहेत यात दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. लवकरात लवकर रस्ता काम व्हावे अशी मागणी जनतेमधून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...