spot_img
अहमदनगरमोकाट बिबट्यांना जेरबंद करा; भूमिपुत्र शेतकरी संघटनेची मागणी

मोकाट बिबट्यांना जेरबंद करा; भूमिपुत्र शेतकरी संघटनेची मागणी

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री:-
पारनेर तालुक्यातील देसवडे, मांडवे, खडकवाडी, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, पोखरी गावांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून लवकरात लवकर या मोकाट बिबट्यांना जेरबंद करा अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिला.

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने अहिल्यानगरचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाळशिराम पायमोडे, संतोष वाबळे, मनोज तामखडे, अन्सार पटेल, अरूण बेलकर, प्रविण खोडदे, रघुनाथ मांडगे, राजू रोकडे, राहुल गुंड आदींसह शेतकरी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बिबटे मानवांवर भ्याड हल्ले करत आहेत. नुकतेच खडकवाडी येथे चिमुकल्या शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला करत तीचा बळी घेतला.

तसेच देसवडे येथेही भर सकाळी योगेश गोळे या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. बिबट्यांच्या या हल्ल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. देसवडे परिसरासह इतर भागात बिबटे मोकाट फिरताना दिसत आहे. त्यामुळे शेतातील पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. बिबट्यांचा वावर पाहता हल्ले वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्यात यावे अन्यथा शेकडो शेतकऱ्यासह आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमध्ये उलथापालथ; उपमुख्यमंत्री पारनेरमध्ये; कोण कोण करणार प्रवेश पहा

पदाधिकार्‍यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती | सुजित झावरे पाटील यांचा शिवसेत पक्षप्रवेश पारनेर / नगर...

किरण काळे यांचे आरोप बिनबुडाचे, निराधार; जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथ्था काय म्हणाले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगरमधील जैन मंदिर ट्रस्टची जागा हडपल्याचा उबाठाचे किरण काळे यांनी केलेला...

अतिवृष्टीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा, कुठे केली पाहणी पहा

ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला सविस्तर आढावा अहिल्यानगर / नगर सह्याद्री जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या...

सोलर पॅनल बसवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पावणेतीन लाखांचा गंडा;

माजी सैनिकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'अंतर्गत सोलर पॅनल...