spot_img
अहमदनगरपारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाचे महत्वाचे आदेश; कोणाकोणावर होणार कारवाई...

पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाचे महत्वाचे आदेश; कोणाकोणावर होणार कारवाई…

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना बेकायदा विक्री केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई आणि क्रांती शुगर अँड पावर प्रा. लि. पुणे या खाजगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश राहुल देशपांडे यांनी दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्जाचा फुगवटा निर्माण केला होता. व त्यानंतर कारखान्याची विक्रीची बेकायदा प्रक्रिया पुर्ण केली. या कारखान्याचा विक्री साठी केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क देऊन सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला होता. ज्या दिनांकास कारखान्याची विक्री केली त्याच दिनांकास क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत घेण्याकरीता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेवून कर्ज पुरवठा केला. कारखाना विक्रीच्या खरेदीखताला बोजा नसलेला बनावट सातबारा जोडण्यात आला. कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेला कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याकरता क्रांती शुगर या कागदोपत्री कंपनीचा वापर करण्यात आला. पारनेर साखर कारखान्याची मालमत्ता केवळ ३२ कोटी रुपयांना विकत घेऊन त्याच मालमत्तेवर सुमारे ३०० कोटी रुपयांचे कर्ज काढले. पारनेर साखर कारखाना विक्रीतुन कर्ज वजा जाता उरलेली सुमारे साडे बारा कोटी रुपये  बॅकेने कारखान्याला परत  केली  नाही. सध्या कारखाना उभा असलेली दहा हेटर औद्योगिक बिगरशेती  जमीन राज्य सहकारी बॅकेकडे तारण नसताना विकली.

पारनेर कारखाना विक्रीच्या या सर्व गैरव्यवहारांबाबत कारखाना  बचाव व पुनर्जीवन समितीने सतरा हजार  सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. औरंगाबाद खंडपीठाने सदर याचिकेवर निर्णय घेण्याचे अधिकार हे पारनेर न्यायालयाच्या कक्षेत येत असल्याचे सांगून याचिका निकाली काढली, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनांप्रमाणे कारखाना बचाव समितीने पारनेर न्यायालयात विक्रीतील दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. पारनेर न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर कारखाना विक्रीतील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विक्री प्रक्रियेत गैरव्यवहार  केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलेला होता. त्या आरोपांची पडताळणी  केल्यानंतर न्यायालयाने पारनेर पोलिसांना फिर्यादीच्या अर्जाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयासमोर कारखाना बचाव समितीच्या वतीने अ‍ॅड. रामदास घावटे, अ‍ॅड. उन्मेश चौधरी यांनी बाजू मांडली.

गुन्हा दाखल करून आरोपींना तातडीने अटक करा…!
पारनेर सहकारी साखर कारखान्याची, शेतकरी, सभासदांची कोट्यवधी किमतीची सार्वजनिक मालमत्ता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गैरमार्गाचा वापर करून विक्री केली आहे. या प्रकरणात राज्य सहकारी बँकेचे दोन अधिकारी, क्रांती शुगर कंपनीचे नऊ संचालक व देवीभोयरेचा तत्कालीन तलाठी यांचा आरोपींत समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पोलिसांनी पालन करून आरोपींचे विरुद्द गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करणारे निवेदन पारनेर पोलिसांना देत आहोत.
साहेबराव मोरे, बबनराव कवाद (कारखाना सभासद)

जवळेत सभासदांचा जल्लोष…!
पारनेर साखर कारखाना विक्रीतील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश होताच जवळे येथील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...