spot_img
अहमदनगरमहत्त्वाची बातमी! या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही जूनचा हप्ता; तुमचं नाव आहे...

महत्त्वाची बातमी! या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही जूनचा हप्ता; तुमचं नाव आहे का?

spot_img

Ladki Bahin Yojana: लाखो महिलांसाठी दिलासा देणारी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या चर्चेत आहे. दरमहा मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. मात्र, या योजनेतील अनेक लाभार्थींना यंदाचा (जून २०२५) हप्ता मिळणार नाही, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य शासनाने योजनेचे निकष स्पष्टपणे जाहीर केले आहेत. तथापि, काही महिलांनी हे निकष न पाळता अर्ज सादर केले आहेत.

परिणामी, अशा महिलांचे अर्ज रद्द होणार असून त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे की, बनावट कागदपत्रे, अयोग्य उत्पन्न माहिती, तसेच राज्याबाहेरील किंवा बांग्लादेशी नागरिकांनी अर्ज केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली बोगस अर्ज व फसवणुकीच्या तक्रारी राज्य शासनाकडे दाखल झाल्या आहेत. त्यावर तात्काळ चौकशी सुरू असून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील असावी. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे. बनावट आधार कार्ड, निवासाचा पुरावा किंवा उत्पन्न प्रमाणपत्र आढळल्यास अर्ज बाद केला जाणार आहे. जून महिना संपण्याच्या काही दिवस आधीपासूनच महिलांमध्ये हप्त्याबाबत उत्सुकता आहे. अधिकृत माहितीप्रमाणे, पात्र लाभार्थींच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...