Ration Card: केंद्र सरकारने नागरिकांना कमीत कमी किंमतीत अन्नधान्य मिळावे, यासाठी रेशन कार्ड दिले आहे. रेशन कार्डवर तुम्हाला कमी किंमतीत अन्नधान्य दिले जाते. यामुळे नागरिकांना चांगला फायदा होतो. केंद्र सरकारच्या या योजनेतून गहू, तांदूळ, तेल अशा जीवनावश्यक वस्तू कमी किंमतीत दिल्या जातात. या योजनेत आता महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजी नगर, अमरावती, वर्धा जिल्ह्यातीस एपीएल म्हणजे केशरी रेशनधारकांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याच्या योजनेस मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या योजनेची सुरुवात जानेवारी २०२३ पासून सुरु झाली आहे. या योजनेत सुरुवातीला लाभार्थ्यांना दरमहा १५० रुपये दिले जायचे. त्यानंतर २० जून २०२४ पासून १७० रुपये दर महिन्याला दिले जातात.
या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्या विपत्तीग्रस्त शेतकऱ्यांनाच रक्कम दिली जाणार आहे.ही रक्कम थेट डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात दर महिन्याला जमा केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्थानिक स्वस्त रेशन दुकानाता जाऊन अर्ज करु शकतात.या योजनेत अर्ज करण्यासाठी बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत आवश्यक आहे. त्याचसोबत रेशनकार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची प्रत लागणार आहे.