पुणे / नगर सह्याद्री –
Pune Ganesh Visarjan 2024 : राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप देण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाईसोबत मानाचे पाच गणपतीची भव्य मिरवणूक पुणे शहरात निघते. ही मिरवणूक पाहण्यासाठी अगदी परेदशातूनही पाहुणे येतात. गणपती मिरवणुकीदरम्यान काही अर्नथ घडू नये आणि वाहतूक कोंडीपासून पुणेकरांची सुटका व्हावी म्हणून 17 सप्टेंबरला पुणे वाहतूक पोलिसांनी नियम जाहीर केले आहेत.
मिरवणुकांसाठी शहरातील 17 रस्ते बंद
गणेश विसर्जनासाठी शहरातील प्रमुख 17 रस्ते बंद असणार आहेत. विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर हे रस्ते खुले करण्यात येणार आहे. पुण्यात मानाच्या गणपतीची मिरवणूक मंगळवारी 17 सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता निघणार आहे. सर्वप्रथम मानाचे गणपती निघाले की इतर सार्वजनिक मंडळांचे गणपती मागर्स्थ होतात.
लक्ष्मी रस्ता
छत्रपती शिवाजी रस्ता
टिळक रस्ता
शास्त्री रस्ता
केळकर रस्ता
बाजीराव रस्ता
कुमठेकर रस्ता गणेश रस्ता
जंगली महाराज रस्ता
कर्वे रस्ता
फर्ग्युसन रस्ता
भांडारकर रस्ता
पुणे-सातारा रस्ता
सोलापूर रस्ता
प्रभात रस्ता
बगाडे रस्ता गुरू नानक
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ‘या’ ठिकाणी असणार पार्किंग व्यवस्था
मुंबईनंतर गणेश विसर्जन पाहण्यासाठी असंख्य लोक पुण्यातही गर्दी करतात. त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांनी आणि पुणेकरांसाठी पुणे वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त केलाय. साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. तर विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. शहरात खालील दिलेल्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलीय.
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाद (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठे (दुचाकी आणि चारचाकी), एच.व्ही.देसाई महाविद्यालय (दुचाकी अन् चारचाकी), हमालवाडा, नारायणपेठ (दुचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर (दुचाकी अन् चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग (दुचाकी), हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूर ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवाले प्रशाला, डेक्कन जिमखाना (दुचारी अन् चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), फर्ग्युसून कॉलेज (दुचाकी अन् चारचाकी), दैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा कॉलेज (दुचाकी), पेशवे पथ (दुचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), नदीपात्र भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी अन् चारचाकी)