spot_img
महाराष्ट्रलाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी, सरकारने काढले पत्रक; पैसे बंद होणार का?

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी, सरकारने काढले पत्रक; पैसे बंद होणार का?

spot_img

लाडकी बहीण योजनेबाबत संभ्रम!; सरकारचे पत्र
मुंबई | नगर सह्याद्री
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत झाला असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरु झाल्या आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार? योजनेचे निकष बदलणार? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहे. याबाबत आता स्वतः आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, या सर्व अफवा असल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. समाज व बालविकास विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

महिला व बालकल्याण विभागाने एक पत्रक जारी केले आहे. याचसोबत आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असं सांगण्यात आले आहे. आदिती तटकरे यांनी म्हटलंय की, ‌’लाडकी बहीण योजनेबद्दल रिल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी यावर लक्ष ठेवून आहे तरी समाजमाध्यमातून होणाऱ्या या चुकीच्या माहितीला कोणीही बळी पडू नये, ही नम्र विनंती.‌’असं त्यांनी म्हटलं आहे.

महिला व बालकल्याण विभागाचे पत्रक
महिला व बाककल्याण विभागाच्या परिपत्रकात म्हटलंय की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांवर रिल्स आणि व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभाथ महिलांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरुन कार्यालयाकडे विचारणा होत आहे. यामुळे आपणास सांगण्यात येते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शतमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अस कळवण्यात येईल. तसेच महिला व बालकल्याण विभागाने शासकीय यंत्रणांना सुचवलं की, त्यांनी लोकांमधील संभ्रम दूर करावा. चुकीच्या माहितीमुळे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नये, याकरता आपण अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभाथ महिला आणि जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी.

घरोघरी जाऊन तपासणी, अपात्र असल्यास एफआयआर?
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सर्वसमावेशक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाचे अधिकारी घरोघरी जाऊन कागदपत्रांची उलट तपासणी करणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरांना प्रत्यक्ष भेटी दिल्या जातील, त्यानंतर सर्व डेटा तपासला जाईल. आणि पात्र, अपात्र ठरवले जाईल. लाडकी बहीण योजनासाठी ज्यांनी खोटे दावे केलेत, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असा प्रस्ताव महिला आणि बाल विकास विभागाने केला आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने मिळालेले लाभ परत करण्याचा पर्याय दिला जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. जिल्हा आणि विभागीय स्तरावर तपासणी केली जाईल, असे महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सध्या राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना मिळत आहे. या योजनेत राज्य सरकारकडून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येत आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होत आहे. आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यात कधी जमा होणार, याची चर्चा आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै 2024 पासून सुरू केलेल्या या योजनेंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत अनेक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‌’ योजनेस पात्र ठरल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रारूप प्रभाग रचना नागरिकांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी?

शहरप्रमुख काळेंचा संतप्त सवाल / राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत शहर ठाकरे सेनेने घेतली १४...

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...