spot_img
अहमदनगरमंत्री आदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती; लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता..

मंत्री आदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती; लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता..

spot_img

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता. तर याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता डिसेंबरच्या हप्त्याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत महत्त्वाची माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी पोस्ट करत म्हटले की, “महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

ही योजना का विशेष आहे?
१) आर्थिक आधार: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार.
२) सन्मानाचा भाव: केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे.
३) सशक्तीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो.

मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं. हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा आहे., असे त्या म्हणाल्या आहेत.

डिसेंबरच्या हप्त्यासाठी ३५०० कोटी रुपयांची तरतूद
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.जुलै ते नोव्हेंबर पर्यंत १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. त्यानंतर आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

केडगाव हादरलं! महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन ते चार जणांनी घेरलं अन्..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील एका परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याचे वृत्त हाती आले आहे....

दोन झेडपी तर चार पंचायत समिती सदस्य वाढले; अनेक गावांचे गट बदलले, वाचा प्रारूप प्रभाग रचना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार सोमवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत...

ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर ; क्रिकेटचाही समावेश, वाचा, कधी कुठली स्पर्धा?

Olympic schedule : बहुप्रतीक्षित ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर झाले असून ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ...

पावसाने पुन्हा एकदा दणका दिला! ‘कमबॅक’ मुळे या’ भागात पुरजन्य स्थिती, अहिल्यानगरलाही इशारा..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची...