spot_img
अहमदनगर..तात्काळ अंमलबजावणी करा! महानगरपालिका कामगार युनियनने सुरु केले उपोषण; नेमक्या मागण्या...

..तात्काळ अंमलबजावणी करा! महानगरपालिका कामगार युनियनने सुरु केले उपोषण; नेमक्या मागण्या काय? वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून यासाठी युनियनच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून विविध आंदोलने केली मागील वर्षी नगर ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला त्यानंतर सरकारने पत्र देऊन बैठकीचे निमंत्रण दिले मात्र अजून पर्यंत सातवा वेतन आयोगाचा निर्णय सरकारने घेतला नाही राज्यातील (ड) वर्ग महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला मात्र अहमदनगर पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला नाही यासाठी आज अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास महापालिकेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बंद करतील असा इशारा अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिला.

राज्य सरकारने अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीसाठी मनपा प्रशासकीय कार्यालयासमोर युनियनच्या वतीने बेमुदत अमरून उपोषण सुरू केले आहे यावेळी उपोषनकर्ते अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर, तसेच सचिव आनंद वायकर, अनंत लोखंडे, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड़ , सागर सालुंके, अजय सौदे, प्रफुल लोंढे, अजित तारु, अंतवन क्षेत्रे, विजय कोतकर, बाळासाहेब व्यापारी, अकील सय्यद, सखाराम पवार, महादेव कोतकर, अमोल लहारे, दिपक मोहिते, नागनाथ पवले, वसंत थोरात, अनवर शेख, सुनील चाफे, मेहेर लहारे, वैभव जोशी, परीक्षित बिडकर, गणेश लयचेट्टी तसेच महापालिकेतील पुरुष व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने आदी उपस्तित होते.

आनंद वायकर म्हणाले की अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा सकारात्मक प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला मात्र सरकारने अजून पर्यंत निर्णय घेतला नाही आमचे आंदोलन हे महापालिकेच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधात आहे तरी सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावे जेणेकरून कर्मचाऱ्यांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी नगरकरांना वेठीस धरण्याचा उद्देश नसून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे तितकेच गरजेचे आहे कारण ते नगरकरांना मूलभूत सुविधां रात्रंदिवस सेवा देत असतात त्यांचे प्रश्न देखील मार्गी लागणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आज मनपा मुख्य कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत अमरण उपोषण सुरू केले यामध्ये मी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, बाबासाहेब राशिनकर, हे बेमुदत उपोषनाला बसणार असून याला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे अशी माहिती जितेंद्र सर यांनी दिली

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संक्रातीच्या मध्यरात्री घटना; दोन तरुणांचा मृत्य, चौघांवर उपचार सुरू…नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाटा येथे चालकाचा कारवरील ताबा...

मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का; अजितदादांचा मोठा निर्णय..

बीड । नगर सहयाद्री:- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन...

आमदार जगताप यांनी दिला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा; कारण आलं समोर…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून कारभार करत असताना अचानक पद्धतीने पाणीपट्टी...

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...