सकल हिंदू समाजाचे मनपा आयुक्तांना निवेदन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्याच्या मध्यभागी मजार, थडगे असल्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. माळीवाडा, चितळे रोड, बालिकाश्रम रोड अशा भागामध्ये रस्त्यांच्या मध्यभागी उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडळथा निर्माण होत आहे.
येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास सदर ठिकाणी हनुमान मंदिर उभारू असा इशारा सकल हिंदू समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांच्यासह हिंदू समाज बांधवांच्यावतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आले.
रस्त्यांच्या मध्ये असलेल्या धार्मिक स्थळांबाबत कोणतेही पुरावे किंवा कागदपत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मजार, थडगे यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नगर शहरातील सकल हिंदुत्वादी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या आठ दिवसांमध्ये कारवाई न झाल्यास अशा स्थळांसमोर हनुमान मंदिर उभारू असा इशारा बेग यांनी दिला.