spot_img
ब्रेकिंगमहानगरपालिका हद्दीतील 'ते' बेकायदेशीर बांधकाम तात्काळ हटवा; माजी नगरसेवक योगिराज गाडे यांची...

महानगरपालिका हद्दीतील ‘ते’ बेकायदेशीर बांधकाम तात्काळ हटवा; माजी नगरसेवक योगिराज गाडे यांची मागणी..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सावेडी विभागातील मिस्कीन मळा समोरील आरक्षण क्र. १९३ व १९५ ही जागा महानगरपालिका विकास आराखड्यानुसार शाळा व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असून, सार्वजनिक हितासाठी राखीव आहे. तरीदेखील सदर जागेवर पुन्हा बेकायदेशीर बांधकाम उभे राहिले असून, याविरोधात आज माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी उपआयुक्त विजयकुमार मुंडे यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली.

गाडे यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती व सद्यस्थिती उपआयुक्तांना देत, तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर महानगरपालिकेने तत्काळ कारवाई केली नाही, तर नागरिकांसह मनपा कार्यालयातच ठिय्या आंदोलन करून बेकायदेशीर बांधकाम पाडेपर्यंत संघर्ष केला जाईल, जसे की २०१६ मध्ये करण्यात आले होते.

यावर उपआयुक्त विजयकुमार मुंडे यांनी आश्वासन दिले की, आंदोलना पर्यंत परिस्थिती जाणार नाही, कारण महानगरपालिका तात्काळ कारवाई करून ही शाळा व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागा संरक्षित ठेवेल आणि बेकायदेशीर बांधकाम हटवेल. सन २०१६ मध्ये महानगरपालिकेने याच जागेवरील बेकायदेशीर बांधकाम हटविले होते, तरीही पुन्हा अवैध रचना उभी राहणे ही गंभीर बाब असल्याचे गाडे यांनी निवेदनात नमूद केले. सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असलेली जागा मोकळी ठेवणे हा नागरिकांचा हक्क असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, जेम्स अल्हाट, गौरव धोणे, आनंद राठोड, प्रथमेश महिंदरकर, संदीप थोंबरे, प्रशांत डेरेकर, मुन्ना भिंगर्डीवे यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खडीमाफिया दत्तात्रय शेळके म्हणतो, कलेक्टर अन्‌‍ पोलीस माझ्या खिशात!

अकोले तहसीलदारांनी वहिवाट रस्ता मंजूर केला, बेलापूरच्या खडी क्रशरवाल्याने उखडून टाकला! 10 लाख खर्चून तयार...

‘सिस्पे’, साकळाई योजनेबद्दल विखे पाटलांचे मोठे विधान, जनतेच्या पैशाची जबाबदारी ‘त्या’ लोकप्रतिनिधीची

पद्मश्रींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना सन्मान; शेतकरी दिनाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. सुजय विखे...

आझाद ठुबे यांच्या राजे शिवाजी पतसंस्थेत 67 कोटींचा घोटाळा

अपहाराशी संबंधित 40 घोटाळेबहाद्दरांसह सहा कर्मचारी दोषी पारनेर | नगर सह्याद्री माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद...

गणेश मंडळांना मिळणार एका क्लिकवर परवानगी; आयुक्त डांगे यांनी दिली माहिती, पहा लिंक..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री गणेशोत्सवात व इतर सण-उत्सव काळात मंडप उभारणी, स्वागत कमानी, रनिंग मंडपसाठी...