spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई; कारण काय? वाचा सविस्तर

मनोज जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई; कारण काय? वाचा सविस्तर

spot_img

जालना । नगर सहयाद्री:-
जालन्यात वाळू माफियांविरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलेय. ९ आरोपींविरोधात तडीपारची कारवाई करण्यात आली. या तडीपारीच्या कारवाईत मराठा आंदोलकांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर यांचा देखील यामध्ये समावेश आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेले 9 आरोपी जालना जिल्ह्यासह बीड ,संभाजीनगर ,परभणी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहेत. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली.

जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल आहे. गजानन गणपत सोळुंके, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, विलास हरिभाऊ खेडकर, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर, विलास हरिभाऊ खेडकर अशी तडीपार करण्यात आलेल्याची नावे आहे.

सदर आरोपीवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, हल्ला करणे यासह सरकारी कामात अडथळा आणण्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत..सदर आरोपी वरती 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. अंबड उपविभागीय न्यायदंडाअधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून आणखीही कारवाईचे प्रस्ताव पेंडिंग असल्याच देखील माहिती मिळत आहे.

वाळू चोरीचे तीन गुन्हे दाखल
विलास खेडकर यांच्यावर 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 2023 मध्ये जालनातल्या शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. 2023 मध्ये गोदावरी नदीतून 100 ब्रास आणि 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी दोन गुन्हे गोंदी पोलिसात दाखल आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...