spot_img
अहमदनगरमी आता योग्य जागी! 'सभापती प्रा. राम शिंदे सोडवणार शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न'

मी आता योग्य जागी! ‘सभापती प्रा. राम शिंदे सोडवणार शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
मी. आता योग्य जागी बसलो आहे. आपल्या जिव्हाळ्याचा कुकडी प्रकल्प माझा आवडता विषय असून शेतकऱ्याचा डिंभे, माणिकडोह बोगदा प्रश्न मार्गी लावणारा असल्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी संगितले. प्रा.राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विठ्ठलराव वाडगे यांनी सत्कार सोहळा, तसेच शेतकरी, महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, पणन महासंघ अध्यक्ष दत्ता पानसरे, संत बाबा महाहंसजी महाराज, व्याख्याते गणेश शिंदे, देव गोपाल महाराज शास्त्री, माजी सभापती शहाजी हिरवे, विठ्ठलराव वाडगे, रुक्मिणी ताई वाडगे, शुभम वाडगे, रघुनाथ डफळ, अजय गावडे, शुभम वाडगे, सायली वाडगे, शिवाजीराव भोस, सुधाकर वांढेकर, दादा ढवाण, मेघना गावडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभापती राम शिंदे बोलत होते.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले, वेळ बदलत असते पूर्वी आपण आणि श्रीगोंदा करानी संघर्ष केला आता पाट पाण्याचे प्रश्न सोडवू. शासकीय नोकरी मिळाली की नोकर वर्ग कुटुंब पुरता विचार करतात पण विठ्ठलराव वाडगे यांनी ग्रामसेवक पदाची नोकरीत स्वेच्छा निवृत्ती घेऊन धार्मिक तसेच शासनाच्या शेतकरी हिताच्या योजना महीला सक्षमीकरण, बाजार समिती या माध्यमातून मोठे योगदान श्रीगोंद्याच्या विकासात दिले आहे .

नामदेव महाराजांचे १८ वे वंशज ह.भ. प.ज्ञानदेव तुळशीदास महाराज नामदास यांनी बोलताना प्रा.राम शिंदे यांनी आपल्या ज्ञानाच्या आधारे यश मिळवत चांगले काम केले. आता सभापती पदाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करताना पुढे म्हणाले विठ्ठलराव वाडगे हे वारकऱ्यांच्या समस्यावर मार्ग काढतात. त्यांचे कृषि, आर्थिक, महीला बचत गट आदी क्षेत्रा बरोबर धार्मिक बाबतही मोठे योगदान आहे. वाडगे यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर निवड व्हावी अशी मागणी केली.

आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रा.राम शिंदे यांनी आमदार प्रशिक्षण वेळी इंग्रजीतून भाषण करून आपले भाषेवरील प्रभुत्व दाखवले ही जिल्ह्यासाठी मानाची बाब आहे. सभापती पदाच्या माध्यमातून कुकडी प्रकल्प मधील आवर्तन आणि डिंभे-माणिकडोह बोगदा बाबत लक्ष घालण्याची मागणी केली. तसेच विठ्ठलराव वाडगे यांना कोणता व्यवसाय केल्याने लोकांचे भले होईल तसेच तालुक्याचा विकास होईल याची नस माहीत आहे.

त्यांच्या यशाचे गमक त्यांनी आम्हा सर्वांना सांगावे त्यांचे कृषि,महीला सक्षमीकरण बाबतचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. यावेळी शेतकरी आणि महीला बचत गट मेळाव्यात शासकीय योजनांची माहिती तसेच कृषि प्रक्रिया उद्योग आणि महीला गृह उद्योगाला चालना मिळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्तविक अण्णासाहेब गावडे यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष दळवी यांनी केले तर आभार मेघना गावडे यांनी मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...