spot_img
अहमदनगरअवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्धवस्त; एकाला अटक, ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्धवस्त; एकाला अटक, ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

शहरातील नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर रोड परिसरात एका शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगच्या मोठ्या अड्ड्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. रविवारी (दि. २६) दुपारी दोनच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी सतीष आनंद टेकाळे (वय ३२, रा. नालेगाव) याला रंगेहाथ पकडले असून, त्याच्याकडून ३२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेप्ती नाका परिसरातील बैरागी वॉशिंग सेंटरच्या पाठीमागे मोकळ्या जागेत, शेडच्या आडोशाला एक व्यक्ती घरगुती गॅस टायांमधून वाहनांमध्ये अनधिकृतपणे गॅस भरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून छापा टाकला. यावेळी आरोपी सतीष टेकाळे हा कोणताही परवाना नसताना, इलेट्रिक मोटार आणि वजनकाट्याच्या सहाय्याने गॅस रिफिलिंग करत असल्याचे आढळून आले. लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असतानाही तो हा जीवघेणा प्रकार करत होता.पोलिसांनी घटनास्थळावरून १० हजार रुपये किमतीची इलेट्रिक मोटार व कॉम्प्रेसर, ४ हजारांचा इलेट्रॉनिक वजन काटा, तसेच एचपी, भारत गॅस व इंडियन गॅस कंपन्यांच्या एकूण ११ घरगुती गॅस टाया (काही भरलेल्या व काही रिकाम्या) असा एकूण ३२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल विनायक पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी सतीष टेकाळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही दिवस पावसाचे, IMD इशारा..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि...

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य

सातारा / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या...

ट्रस्ट जमीन प्रकरणी जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अशा आहेत मागण्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त...

क्षुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला; नगरमध्ये धक्कादायक प्रकार

भावासह कुटुंबालाही मारहाण | बुरूडगाव येथील घटना अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुयातील बुरुडगाव येथे मला...