spot_img
ब्रेकिंगदोन्ही आमदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष?; 'या' आगाराच्या नशिबी जुन्या बस!

दोन्ही आमदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष?; ‘या’ आगाराच्या नशिबी जुन्या बस!

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड आगारात अगोदरच नऊ वर्षांच्या जुन्या बस आणि आता तारकपूर आगारातून पाच जुन्या बस घेऊन जाण्याबाबत विभागनियंत्रकांने आदेश काढले आहेत. वर्षभरापूर्वी श्रीगोंदे डेपोतून पाच नवीन बस मिळणार होत्या परंतु तेथील नागरिकांनी आंदोलन केले आणि बस मिळाल्या नाहीत. जामखेड आगाराला नवीन बस मिळावे म्हणून आ. रोहीत पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता तर सहा महिन्यापूर्वी आमदार प्रा. राम शिंदे यांनी जामखेड आगाराला नवीन बस मिळाव्यात म्हणून नाशिक विभाग नियंत्रक यांना मागणी केली होती दोन्ही आमदारांचा राज्याच्या राजकारणात प्रभाव असताना परिवहन महामंडळाकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा विभाग नियंत्रकाकडून मिळणाऱ्या दुजाभावचा तालुका प्रवासी संघटनेने निषेध केला आहे.

जामखेड आगार पाच जिल्ह्य़ाच्या सिमेवर असल्याने सदर आगार व बसस्थानक चोवीस तास चालू असते. मागील २०, २५ वर्षापूर्वी जामखेड आगार नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर होता व जिल्ह्यात नव्हे तर नाशिक विभागात दबदबा होता. सध्या जामखेड आगारात ५० बस असून त्या नऊ वर्षे जुन्या आहेत. दोन शिवशाही व दोन स्लिपरकोच आहे. जुन्या बस असल्याने त्या कोठेही बंद पडतात यामुळे या बसमधून प्रवास करण्यास प्रवासी धजावत नाही. परिणामी आगाराच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. प्रवासी भाडय़ात १५ टक्के दरवाढ झाली त्याप्रमाणे सुविधा मिळत नाही. व वर्षोनुवर्षे वापरलेल्या जुना बसमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

जामखेड आगाराला नवीन बस मिळाव्यात म्हणून तालुका प्रवासी संघटनेने वारंवार जिल्हा विभाग नियंत्रकाकडे मागणी केली होती. याबाबत आ. रोहीत पवार व आ. प्रा. राम शिंदे यांना यापूर्वी पत्र देऊन मागणी केली होती. आ. रोहीत पवार यांनी विधानसभेत जामखेड आगाराची परिस्थिती व बसची परिस्थिती नमूद करून नवीन बस मिळावे अशी मागणी केली होती. तसेच आ. राम शिंदे यांनी जिल्हा विभाग नियंत्रक, नाशिक विभाग नियंत्रक यांना मोबाईलवरून संवाद साधून नवीन बस आल्या की जामखेड आगाराला प्राधान्य देण्या बाबत सुचवले होते. तरी पुन्हा जामखेड आगाराला जुन्या बस मिळाल्या आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...