spot_img
अहमदनगरनगरची कायदा सुव्यवस्था बिघडली, वकीलच असुरक्षित तर नगरकरांचे काय?; माजी महापौर कळमकर...

नगरची कायदा सुव्यवस्था बिघडली, वकीलच असुरक्षित तर नगरकरांचे काय?; माजी महापौर कळमकर यांनी केले गंभीर आरोप, वाचा सविस्तर…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री- 
नगर जिल्ह्यात मागील काही काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवणार्‍या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. मागील आठवड्यात राहुरीतील आढाव वकील दाम्पत्याचे अपहरण करून खून करण्यात आला. नगर जिल्ह्यात पोलिस दलाची कार्यपद्धती, गुन्हेगारांना वेसण घालण्यात येत असलेले अपयश अशा अनेक गोष्टींचा उहापोह होणे गरजेचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष, माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

कळमकर म्हणाले, न्यायिक प्रक्रियेचा महत्वाचा घटक असलेले वकीलही आता सुरक्षित राहिले नाहीत. सराईत आरोपींनी वकील दाम्पत्याचा थंड डोक्याने खंडणीसाठी खून केला. पोलिसांनी घटनेनंतर जलद तपास करून आरोपी जेरबंद केले. मात्र या घटनेचे वकील वर्गात तीव्र पडसाद उमटले आहेत. न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे. ही घटना फक्त वकील वर्गापुरती मर्यादित नाही. शासकीय यंत्रणा, पोलिसांवर धाक असणे, त्यांना कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाचा, लोकप्रतिनिधींचा दबाव असणे आवश्यक आहे.

आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः वकील आहेत. त्यांच्या पक्षाच्या रचनेत ते अहमदनगर जिल्ह्याची धुरा सांभाळतात अशीही माहिती आहे. पण नगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था, ताबेमारीचे गुन्हे, खून, दरोडे अशा घटनांची त्यांनी कधीही गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसले नाही. सत्ताधारी तीन पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधी तर सध्या निवडणुकीच्या इव्हेंटमध्ये मग्न आहेत. एकही सत्ताधारी लोकप्रतिनिधी पोलिसांची कार्यपद्धती सुधारावी यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख उंचावतच आहे.

कळमकर म्हणाले, नगर शहरातही खून, चोर्‍या, दरोडे, ताबेमारीचे प्रकार वाढत आहेत. त्यावर पोलिसांचा अंकुश राहिलेला नाही. शहरातील व्यापारी दहशतीत आहे. मध्यंतरी स्थानिक लोकप्रतिनिधींना या प्रश्नावर उपोषणाचा इशारा द्यावा लागला. यावरून लोकप्रतिनिधी किती हतबल झाले किंवा ते राजकारणातच किती मग्न आहेत, हे समोर येते. सध्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी गावात गावात जाऊन आश्वासनांची खैरात दिली जात आहे. यात कायदा सुव्यवस्था राखून नगरकरांना दहशत मुक्त सुरक्षित हमी देण्याचा विसर सगळ्यांनाच पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...