spot_img
ब्रेकिंगमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर मी... ; मंत्री मुंडे बोलले..

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर मी… ; मंत्री मुंडे बोलले..

spot_img

बीड / नगर सह्याद्री –
नैतिकतेतून मी दोषी वाटत नाही, पण जर मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा. मुख्यमंत्र्यांनी तशी मागणी केली तर मी राजीनामा देण्यास तयार आहे,असं विधान दिल्ली दौऱ्यावर असलेले धनंजय मुंडे यांनी केलंय. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना फासावर चढवा, असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे म्हणालेत.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झालीय. कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. दरम्यान याप्रकरणी विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्याचदरम्यान धनंजय मुंडे हे दिल्ली दोऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे ते राजीनामा देणार, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. आज दिल्लीला धनंजय मुंडे यांना प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जर मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. परंतु नैतिकतेतून मी दोषी वाटत नसल्याचंही धनंजय मुंडे यावेळी म्हणालेत.

प्रल्हाद जोशी हे केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री आहेत. मी राज्यातील महायुती सरकारचा अन्न व पुरवठा मंत्री आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंद करण्यासाठी आलो होतो. तसेच राज्यातील नागरिकांना रेशन मिळण्याबाबत काही समस्या होत्या त्यांची माहिती मी त्यांना दिली. राज्यातील लोकसंख्या वाढली आहे. आता फक्त सात कोटी लोकांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळतोय. जनसंख्या वाढली तर जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे होता. तसेच जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांची सर्व माहिती द्यावी लागते. त्यात ऑनलाईनची जी समस्या आहेत, त्याची माहितीही आपण केंद्रीय मंत्र्यांना दिली असल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...