spot_img
अहमदनगरश्रीरामपुरातील अतिक्रमणांवर हातोडा!; सागर बेग यांचा प्रशासनाला मोठा इशारा

श्रीरामपुरातील अतिक्रमणांवर हातोडा!; सागर बेग यांचा प्रशासनाला मोठा इशारा

spot_img

प्रशासनाने मागणीची दखल न घेतल्यास बाजारपेठ बेमुदत बंद ठेवणार
सागर बेग । अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात मोर्चा
श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
शहरातील राज्य महामार्ग मोठा असून दुकाने देखील मोठी आहे. त्यामुळे ५० फुटापर्यंत अतिक्रमण काढले तरी योग्य आहे. परंतु मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमण ५० फुटापर्यंत काढल्यास छोटे-मोठे व्यापारी उध्वस्त होईल. ४० फुटापर्यंत अतिक्रमण काढले तर व्यापारी व्यवसाय करतील. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण ४० फुटापर्यंत काढावे, अशी आमची मागणी आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास बेमुदत बाजारपेठ बंद ठेवण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी दिला.

शहरातील जुनी बाजारपेठेत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात व्यापाऱ्यांनी आवाज उठवत अतिक्रमणाविरोधात राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष सागर बेग, भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि सामाजिक कार्यकर्ते आपचे नेते तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष सागर बेग बोलत होते.

सागर बेग म्हणाले, शहरातील व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात व्यापार वाढण्याची संधी असते, पण प्रशासनाच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा फटका बसेल. प्रशासनाने रस्त्याची रुंदी ४० फूट ठेवल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान टळेल. व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा विचार न करता थेट कारवाई करणे अन्यायकारक आहे. असेही त्यांनी ठामपणे सांगितले. प्रशासनाकडे विचार करून योग्य तोडगा काढण्याची मागणी बेग यांनी केली.

आंदोलनात राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग, आपचे नेते तिलक डुंगरवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाप्रमुख दीपक पठारे, भाजपा जिल्हा सचिव दत्ता खेमणर, पत्रकार समीर माळवे, कामगार नेते नागेश सावंत, भाजपचे रुपेश हरकल, विकास डेंगळे, व्यापारी असोसिएशनचे स्वप्निल चोरडिया, गौतम उपाध्ये, बंडू शिंदे, भैय्या भिसे यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चादरम्यान व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणा देत आपला विरोध दर्शवला.

व्यापारी टिकला तर शहर टिकेल
राज्य महामार्गवरील ५० फुटापर्यंत अतिक्रमण काढणे योग्य आहे. परंतु मुख्य बाजारपेठेतील मेन रोड वरील अतिक्रमण कमी प्रमाणात काढले पाहिजे. कारण व्यापारी जगला पाहिजे, व्यापारी टिकला पाहिजे. व्यापारी टिकला तर शहर टिकेल त्यामुळे पालिकेने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण ४० फुटापर्यंत काढले पाहिजे अशी आमची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असून प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास मोठे अंदोलन छेडण्यात येईल.
– नितीन दिनकर,  जिल्हाध्यक्ष भाजपा 

अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता;तिलक डुंगरवाल
अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. प्रशासनाने ५० फूट रुंदीचा निर्णय कायम ठेवला, तर अनेक व्यावसायिक उद्ध्वस्त होतील आणि त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या निर्णयावर पुनर्विचार करावा, व्यापाऱ्यांचे हित आणि शहर विकास यांचा समतोल राखून योग्य तोडगा काढण्याची मागणी आपचे नेते तिलक डुंगरवाल यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...