पुणे / नगर सह्याद्री : लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यात. सध्या अनेकांचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. तेथे पवार कुटुंबियांमध्ये लढत होणारा असल्याचे स्पष्ट संकेत सध्या मिळत आहे. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे लढत रंगणार असल्याचे सध्या दिसत आहे. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटालाच आहे तर महायुतीत अजित पवार यांच्या गटाला ही जागा देण्यात येणार आहे. या लढतीसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी शरद पवार गटाची रणनीती सांगितली.
आ. रोहित पवार म्हणाले…
बारामती लोकसभेत काकी विरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आत्तापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळे बारामतीत खरी लढत ही सुप्रियाताई विरुद्ध अजितदादा अशी होणार आहे. यामुळे प्रचारात आम्ही अजित दादांविरोधात बोलू असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान त्यांनी यावेळी अजित पवार यांना शिरुरची जागा मिळणार नाही, असा दावा केलाय. ते म्हणाले, शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांना पाडणार असे अजित पवार म्हणतात. या मतदार संघात अमोल कोल्हे विरोधात पार्थ पवार ही असू शकतात. परंतु अजितदादांना महायुतीत चारच जागा मिळणार आहेत. त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही असे म्हटले आहे.