spot_img
ब्रेकिंग"अशी पावलं टाकली तर... " ; वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

“अशी पावलं टाकली तर… ” ; वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

spot_img

पुणे । नगर सहयाद्री:-
महंत रामगिरी महाराजांच्या नुकत्याच वादग्रस्त वक्तव्यामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली आहेत. अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरसह अन्य ठिकाणी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील नाव न घेता निशाणा साधत प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा थेट उल्लेख न करता, सामाजिक ऐक्याला धक्का बसेल, अशी पावलं टाकली तर तो वारकरी संप्रदायाचा विचार नाही. पिढ्यांपिढ्या एकसंघ राहिलेल्या समाजात छोट्या- मोठ्या प्रसंगातून कटुता झालेली पाहायला मिळते. चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी घालणारी लोकं आहेत, असं शरद पवार म्हणाले.

समाजाच्या व्यापक हिताचा विचार करणारी लोकं देखील या क्ष्रेत्रात आहेत. त्यांची संख्या कमी असेल. ज्ञानोबा आणि संत तुकाराम यांचे विचार ऐकले. तुकोबांनी आयुष्यभर उपेक्षितांच्या हिताची भूमिका घेतली होती. ढोंगी राजकारण आणि ढोंगी समाजकारण करणार्‍यांना चोख उत्तर दिलं. समाजाला योग्य दिशेला नेण्याचं काम केलं, असं शरद पवार म्हणाले.

मी आज भाषण करायला नाही तर ऐकायला आलोय. निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन आपण कार्यक्रम नाही केले पाहिजे. महत्त्वाची गरज म्हणजे एक समाज तयार व्हायला पाहिजे तो समाज पुरोगामी पाहिजे. वारकरी सांप्रदय म्हणून काम करणारे अनेक लोकं आहेत. त्यांचे विचार ऐकण्याची अनेक वेळा संधी येते. ज्यांच्याकडून समाजात भूमिका घेण्याची अपेक्षा आहे ते जात, धर्म बघून भूमिका घेतात, असा टोला शरद पवारांनी लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...