spot_img
ब्रेकिंग"रवी राणासारखे छपरीमहायुतीत असतील तर आम्ही बाहेर पडू"

“रवी राणासारखे छपरीमहायुतीत असतील तर आम्ही बाहेर पडू”

spot_img

अमरावती । नगर सह्याद्री
राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे सर्वच पक्षांना वेध लागले आहेत. राज्यपालपदी नियुक्तीवरून भाजपवर आश्वासन फेटाळल्याचा ठपका ठेवत माजी खासदार नवनीत राणांच्या जात वैधतेला आव्हान देणारा देणारे शिवसेना नेते आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी आज आमदार रवी राणांवर जोरदार टीका केली आहे. “रवी राणा सारखे छपरी लोक महायुतीमध्ये असतील तर आम्ही बाहेर निघू” असं म्हणत अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर पुन्हा एकदा निशाणा साधण्याचा दिसतय.

मला गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल पदाचे आश्वासन दिले होते, असं म्हणत शिवसेना नेते आनंद अडसूळ यांनी भाजपवर विश्वासघाताचा आरोप केला होता. यावर अडसूळ अमित शहांना ब्लॅकमेल करत असल्याचे रवी राणांनी म्हटलं होतं. या वक्तव्यावर आता अभिजीत अडसूळ यांनी रवी राणांवर हल्लाबोल केलाय.

अमरावती लोकसभेची जागा आनंदराव अडसूळ यांनी लढू नये. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देतो असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दिलं होतं. त्यानंतर अमित शहा यांच्या विनंतीला मान देत आनंदराव अडसूळ यांनी लोकसभा निवडणूक लढली नाही. आज जर ते निवडून आले असते तर अमरावती जिल्ह्याला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळाला असतं. मात्र या जिल्ह्याचा आणि शिवसेनेचा लॉस झाला आहे असं अभिजीत अडसूळ म्हणाले.

रवी राणा यांचे वक्तव्य अतिशय बालिशपणाचे आणि अस संसदीय वक्तव्य आहे. सगळ्या पक्षांचे नेते त्यांच्या विरोधात असतात असे म्हणत अभिजीत अडसूळ यांनी रवी राणांवर जोरदार टीका केलीये. हे असे छपरी नेते शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवर आशीर्वाद चे भाषा वापरत असतील आणि असे नेते स्वतःला महायुतीचे नेते समजत असतील तर महायुती मधून त्यांना बाहेर फेकले गेले पाहिजे. हे असे छपरी लोक जर महायुतीमध्ये राहत असतील तर आम्ही शिवसेनेतून बाहेर पडू, असे अभिजीत अडसूळ म्हणाले.

अमरावती मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर उभा राहिलेल्या नवनीत राणांवर शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी जोरदार निशाणा साधलाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...

गुड न्यूज! 13 मे पर्यंत मान्सून अंदमनात धडकणार

मुंबई | नगर सह्याद्री मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यावष मान्सून लवकरच दाखल होणार...