spot_img
अहमदनगरयांचासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी बलिदान देण्यास तयार; माजी...

यांचासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी बलिदान देण्यास तयार; माजी मंत्री थोरात यांचे मोठे वक्तव्य

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी संगमनेरमधील कीर्तनानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना इशारा देताना आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावे लागले, अशी भाषा वापरली होती. यावर बाळासाहेब थोरातांनी पत्रकार परिषद घेत, ‌’मी काही महात्मा गांधी नाही अन होऊ शकत नाही. परंतु असा कुणी नथुराम गोडसे समोर आल्यावर, विचार अन तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील‌’, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात दिली आहे.

बाळासाहेब थोरातांच्या या प्रतिक्रियेचे संगमनेरसह महाराष्ट्रात भावनिक पडसाद उमटू लागले आहेत. यांनी मंगळवार दि. 19 रोजी पत्रकार परिषद घेत संगमनेरमधील कीर्तनातील राजकीय गोंधळावर भाष्य केले. तसेच तथाकर्थित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी नथुरामजी गोडसे होण्याची वापरलेली भाषेवर प्रतिक्रिया देताना, कीर्तनकारांची पथ्य काय? राज्यघटनेतील मुलभूत तत्व काय आहेत? याची मांडणी करताना विरोधकांना सुनावले आहे.संग्रामबापू भंडारे यांनी, मला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल, असा इशारा दिला आहे. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, संगमनेरच्या घुलेवाडीतील कीर्तनात घडलं काय, त्यावर त्यांना कुणी थांबवलं नाही. परंतु त्यांनी मूळ अभंग सोडून, ज्यावेळेस ते इकडचे-तिकडचे, दुसरे विषय बोलायला लागले, स्थानिक राजकारणावर बोलायले लागले, राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वावर बोलायला लागले, नकारात्मक बोलायला लागेल, तेव्हा एका युवकाने उभं राहून, महाराज तु्‌‍म्ही अभंगावर बोला, एवढचं म्हटला.‌’कीर्तनात काय काय वक्तव्य केले महाराजांनी, तर ते तथाकथित महाराज आहे.

खऱ्या वारकारी संप्रदायाच्या परंपरेत काही असे घुसले आहेत, राजकारण करण्यासाठी घुसले आहेत, त्यातला तो प्रकार आहे. आणि त्यानंतर त्याने जे केलं, कुणीही त्यांचं कीर्तन तिथं थांबवलं नाही, कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही, त्यांच्या गाडीची तोडफफोड झालेली नाही, तिथं पत्रकार मंडळी होती. त्यांना सर्व माहिती आहे‌’, असे थोरातांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले.परंतु खोट्या-नाट्या केसेस करणं, हा सर्व उद्योग सुरू झालेले आहेत. माझं मत असे आहे की, इथले लोकप्रतिनिधी, इथले महाराज कुणाच्या तरी हातातील खेळणं बनलेले आहेत. संगमनेर तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्रात देखील, अशीच वक्तव्य करत फिरत असतात, ही वस्तूस्थिती असल्याचे गंभीर निरीक्षण माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी नोंदवले.महात्मा गांधीजींसारखं, असं बलिदान आल्यास आनंदानं घेईल मी! जर कुणी, तत्त्वाकरता, विचाराकरता जगत असताना, कुणी आमच्यासमोर, असा नथुराम गोडसे आला एखादा तर, मी बलिदान घेण्यास मागे पुढे पाहणार नाही, आनंद घेईल. मी महात्मा गांधी नाही, पण विचाराकरताना बलिदान आनंदानं स्वीकारण्याची तयारी आहे‌’, असे माजी मंत्री थोरात यांनी म्हटले.

थोरातांना धमकी देणाऱ्यावर कारवाई करा: दीप चव्हाण
बाळासाहेब थोरात हे राज्यातील ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री तसेच सुसंस्कृत व संयमी नेतृत्व म्हणून परिचित आहेत. अशा नेत्याला थेट जिवे मारण्याची धमकी देणे ही अतिशय निंदनीय आणि लोकशाहीविरोधी बाब आहे. स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या संग्राम भंडारे यांनी दिलेली ही धमकी केवळ संतपरंपरेच्या पवित्र भूमीचा अपमान नाही, तर वारकरी संप्रदायालाही न पटणारी आहे. काँग्रेस पक्ष या संपूर्ण घटनेचा तीव्र निषेध करतो. धमकी देणाऱ्या संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केली.

संग्रामबापू भंडारे यांच्या विरोधात वारकरी संप्रदाय मैदानात
वादग्रस्त कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या विरोधात वारकरी संप्रदाय मैदानात उतरला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अमर ठोंबरे यांनी त्यांचे कान टोचले आहे. स्वतःला कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार म्हणून घेणाऱ्या लोकांची भाषा दुसऱ्याला संपवण्याची असते का?असा सवाल केला आहे. ज्या महात्मा गांधीजींनी सहिष्णुतेचा धडा सबंध राष्ट्राला दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली त्या राष्ट्रपित्याचा वध करणाऱ्या नथुराम गोडसे यांचे उदातीकरण करून आम्हाला नथुराम व्हावं लागेल, अशी संतापजनक टिप्पणी करणाऱ्या संग्राम बापू विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीचे नाशिक जिल्हा प्रमुख प्रा. अमर ठोंबरे यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हार्दिकला मोठा झटका, शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी

आशिया कपसाठी सूर्याच्या शिलेदारांची निवड नगर सह्याद्री वेब टीम - आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज घोषणा...

बंदुकीच्या धाकाने पत्नीला मारहाण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील सागर हॉटेलजवळ राहणाऱ्या स्नेहल निखिल शेकडे...

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर; कारण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात सन 2005 पासून कंत्राटी पद्धतीने काम...

केडगावात फुटली विकास कामांची हंडी

संदीप कोतकर युवा मंचच्या दहीहंडीला सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची हजेरी; दहीहंडी महोत्सवाला हजारो...