बीडच्या परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांचे अजब आश्वासन, मतदारसंघात चर्चा
बीड / नगर सह्याद्री
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला धुरळा उडलाय. प्रचार करताना आरोप-प्रत्यारोप आणि आश्वासनाचा पाऊस पडतोय. परळी विधानसभा मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या वक्तव्याचीही बीडमध्ये जोरदार चर्चा आहे. मी आमदार झालो, तर सर्व पोरांची लग्न लावून देतो, असे आश्वासन राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारांना दिले. परळीच्या मैदानात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा आमनासामना होत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीरडून मंत्री धनंजय मुंडे मैदानात आहेत, तर पवारांच्या राष्ट्रादीकडून राजेसाहेब देशमुळ नशिब अजमावत आहेत.
बीडमधील परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मंगळवारी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बोलताना त्यांनी मतदारांना अजब आश्वासन दिले. ‘जर उद्याच्या काळात मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करु’ असे अजब आश्वासन बीडच्या परळी मतदारसंघातील राजेसाहेब देशमुखांनी दिले.
यावेळी राजेसाहेब देशमुख म्हणाले की, परळी परिसरात तरुण पोराला नातेवाईक म्हणून येत असताना विचारतात नोकरी आहे का? काही कामधंदा आहे का? पालकमंत्र्यांनाच येथे काही उद्योगधंदा नाही? तुमचा कुठून येणार? एकही उद्योगधंदा उभा केला नाही, यामुळे मुलांचे लग्न होणे मुश्कील झाले आहे. पण मी सर्व पोरांना या ठिकाणी आश्वासन देतो ‘जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करु’ सगळ्या पोरांना कामधंदा देऊ, अतिशय जोरदार पद्धतीने या ठिकाणी बाबुराव तुमचं लग्न करायचंय.. त्यामुळे आगे बढो असे म्हटल्याशिवाय पर्याय नाही.
राजेसाहेब देशमुख यांनी दिलेल्या अजब आश्वासनाची बीडमध्ये आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे. शरद पवार गटाने बीड जिल्ह्यात परळी मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. सर्वत्र दादागिरी सुरू आहे. पोलीस निरीक्षक प्रचार करायला लागले असून शिरसाळ्यामध्ये दहिफळे पोलीस निरीक्षक पक्षप्रवेश करायला लागले आहेत, असंही राजेसाहेब देशमुख म्हणाले.