spot_img
अहमदनगरकर्मचाऱ्यांनो कुणाचा प्रचार कराल तर...; आयुक्तांनी काय दिलाय इशारा

कर्मचाऱ्यांनो कुणाचा प्रचार कराल तर…; आयुक्तांनी काय दिलाय इशारा

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीच्या राजकीय कार्यक्रम व प्रचारात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये. अधिकारी किंवा कर्मचारी निवडणूक प्रचारात सहभागी असल्याचे आढळल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ नुसार कोणतीही नोटीस न देता फौजदारी स्वरूपाची व महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

याबाबत आयुक्त डांगे यांनी सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आदेश काढले आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील कलम ५ नुसार कोणत्याही शासकीय कर्मचा-याला, कोणत्याही राजकीय पक्ष किंवा राजकारणात भाग घेणा-या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही किंवा त्याच्याशी अन्य प्रकारे संबंध ठेवता येणार नाही, अशी तरतूद आहे. कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणूकीत प्रचार करू शकणार नाही किंवा हस्तक्षेप करू शकणार नाही, त्यात भाग घेऊ शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिकारी किंवा कर्मचारी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी असल्यास त्याला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ नुसार कोणतीही नोटीस न देता फौजदारी स्वरूपाची व महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फीची कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मतदार यादीच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय, कोणाचा फायदा, कोणाला झटका?

मुंबई / नगर सह्याद्री - एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची...

प्रतिक्षा संपणार? आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल…

मुंबई / नगर सह्याद्री राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी...

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...