spot_img
ब्रेकिंगIAS पूजा खेडकर यांच्या आईला अटक! महाडमधील हॉटेलमधून घेतले ताब्यात

IAS पूजा खेडकर यांच्या आईला अटक! महाडमधील हॉटेलमधून घेतले ताब्यात

spot_img

पुणे । नगर सहयाद्री:-
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी महाडमधील पार्वती हॉटेलमधून पहाटे मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता आणि त्या फरार होत्या.

मनोरमा खेडकर यांनी जमिनीच्या वादातून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून धमकावले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि त्या फरार होत्या. महाड तालुक्यातील हिरकणवाडीमध्ये पार्वती हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्या होत्या.

अखेर आज पहाटे पुणे पोलिसांनी त्या हॉटेलमधून त्यांना अटक केली. स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करून पोलिस त्यांना पुण्यातील पौड पोलिस ठाण्यात घेऊन येत आहेत. मनोरमा खेडकर यांच्या अटकेनंतरही पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर अद्याप फरार आहेत. पुणे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

IAS पूजा खेडकर यांच्यावर कारवाई
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम सरकारने स्थगित केला आहे. त्यांना 23 जुलैपर्यंत लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसूरी येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरी सेवा परीक्षेत निवड होण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...