spot_img
ब्रेकिंग‘मुलाचे बरेवाईट झाल्यास सोडणार नाही’; विद्यार्थिनीला धमकावणे पडले महागात, वाचा प्रकरण

‘मुलाचे बरेवाईट झाल्यास सोडणार नाही’; विद्यार्थिनीला धमकावणे पडले महागात, वाचा प्रकरण

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर प्रेमसंबंधासाठी बळजबरी, सतत पाठलाग आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी शिवगणेश राजू उगले याच्यासह त्याचे पालक राजू उगले व ऋतुजा उगले सर्व (रा. निर्मलनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, सन २०२४ मध्ये शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिची ओळख सिनिअर विद्यार्थी शिवगणेश उगले यांच्याशी झाली. सुरुवातीला मैत्रीचे नाते असले तरी, शिवगणेशने तिच्याकडे प्रेमाचा तगादा लावला, ज्यास तरुणीने वारंवार नकार दिला. नकार दिल्यानंतरही आरोपीने तिचा पाठलाग सुरू ठेवला आणि इन्स्टाग्राम आयडी-पासवर्ड घेतला.

६ ऑक्टोबर रोजी पीडितेने कौटुंबिक वाढदिवसाचा स्टेटस सोशल मीडियावर टाकल्यावर आरोपीने वाद घालून तिला शिवीगाळ केली. नंतर तिने आरोपीला ब्लॉक केले असता, त्याने स्नॅपचॅटवरून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या छळामुळे पीडित तरुणीला शिक्षणासाठी श्रीरामपूर येथे तिच्या मामाच्या घरी पाठवावे लागले, परंतु आरोपीने तेथेही फोन करून धमकावले.

धक्कादायक म्हणजे, आरोपीचे पालक राजू व ऋतुजा उगले यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांना फोन करून शिवीगाळ केली आणि ‘मुलाचे बरेवाईट झाल्यास सोडणार नाही’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिल्लीत भीषण स्फोट; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लेखोरांना तीव्र शब्दांत इशारा; एकालाही सोडणार नाही..

नवी दिल्ली | वृत्तसंस्था देशाची राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटामुळे हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्‌‍याजवळील लाल किल्ला...

टाकळी ढोकेश्वरचा वाळू माफिया गजाआड ;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

१५ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू माफियाविरुद्ध...

आ. सत्यजीत तांबे यांची पत्रकार परिषद; संगमनेरकरांसाठी महत्वाची अपडेट..

संगमनेर । नगर सहयाद्री:- संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या थेट सहभागातून जाहीरनामा...

नगर ब्रेकिंग! कामरगाव शिवारात बिबट्या ठार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव शिवारात अहिल्यानगर- पुणे महामार्गावर सकाळी 6.00 वाजन्याच्या...