spot_img
ब्रेकिंग'तुझ्या मुलाला पास करतो, तू फक्त खूश कर'; बुलढाण्यात शिक्षकाचा धक्कादायक प्रकार

‘तुझ्या मुलाला पास करतो, तू फक्त खूश कर’; बुलढाण्यात शिक्षकाचा धक्कादायक प्रकार

spot_img

बुलढाणा / नगर सह्याद्री –
बुलडाण्यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलडाण्याच्या मलकापूरमध्ये ही घटना घडली आहे. मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू असे म्हणत आरोपी शिक्षकांनी महिलेवर बळजबरी करत बलात्कार केला. याप्रकरणी वर्गशिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

‘तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणू, यासाठी तू फक्त आम्हाला खूश कर, अशी शरीरसुखाची मागणी दोन वर्ग शिक्षकांनी एका विद्यार्थ्याच्या आईकडे केली. या दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवर वारंवार बलात्कार केला. या घटनेमुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे या दोन्ही शिक्षकांनी ते शिकवत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्याच्या ३४ वर्षीय आईला आमिष दाखवून बळजबरीने वेळोवेळी बलात्कार केला. तसेच त्या दोघांना खूश ठेवले नाही तर तिला आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या दोन्ही नराधम शिक्षकांना अटक केली. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...