spot_img
तंत्रज्ञानमी पुन्हा येईन! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच? १३७ आमदारांचा पाठिंबा, दिल्लीत महत्त्वाची...

मी पुन्हा येईन! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच? १३७ आमदारांचा पाठिंबा, दिल्लीत महत्त्वाची बैठक

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हाती लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव स्विकारावा लागला. मात्र, विधानसभा निवडणुकीत पुन्हा नव्या जोमाने भाजप कामाला लागली. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने नव्याने पक्ष उभारणीसाठी काम केलं. प्रचार केला, ग्राऊंड लेव्हलला काम केलं, लोकांपर्यंत पोहोचले, त्याचाच फळ त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळताना दिसत आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम येथून देवेंद्र फडणवीस यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. तर, भाजपने एकट्याने १३० जागांवर आघाडी घेतली आहे. हा विजय अत्यंत मोठा मानला जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आता मुख्यमंत्रीपदी आरएसएस आणि भाजपकडून हायकमांडची पसंती असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांचाही फडणवीसांना पाठिंबा आहे. भाजपाच्या पाठिंब्यामुळे चार सहयोगी पक्षतील आमदार निवडून आले. विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला पाठिंबा आहे. 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 137 वर पोहोचली आहे. महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती देण्यात आली आहे. भाजपनं आपल्या कोट्यातून ४ जागा मित्र पक्षांना सोडल्या होत्या, त्यापैकी ३ जागांवर विजय झाला असून तिन्ही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पर्थ टेस्टमध्ये टीम इंडियाने मिळवला विजय; ऑस्ट्रेलिया पुन्हा दुसऱ्या स्थानावर

WTC Points Table after Perth Test: पर्थ टेस्टमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. पर्थच्या ऑप्टस...

“…म्हणजे हा सुनियोजित कट”; आ. राम शिंदे यांच्या दाव्याने महायुतीत नवा ट्वीस्ट!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री- मी नियोजित कटाचा बळी ठरलो, असा आरोप करत राम शिंदेंनी थेट...

कामगार हादरले! MIDC मधील कंपनीत मोठा स्फोट; प्लँट ऑपरेटर..

Maharashtra News Today: एका रासायनिक कंपनीमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ...

बळीराजासाठी जुगाड! पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा वापरा ‘ती’ ट्रिक्स..

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी...