spot_img
अहमदनगरश्रीगोेंद्यातून मीच पुन्हा आमदार होणार; राहुल जगताप नेमकं काय म्हणाले पहा..

श्रीगोेंद्यातून मीच पुन्हा आमदार होणार; राहुल जगताप नेमकं काय म्हणाले पहा..

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री

प्रचारादरम्यान श्रीगोंदा- नगरमधील मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता नागवडे-पाचपुते या दोघांही विरोधकांना घाम फुटला आहे. अपक्ष निवडणूक लढवित असलो तरी मतदारांच्या मिळणार्‍या प्रेमाच्या जोरावर विधानसभेत जोरदार एन्ट्री करणार असल्याचा विश्वास माजी आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केला.

मविआत जागा वाटपात उमेदवारी डावलल्याने राहुल जगताप यांनी अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. आढळगाव येथील सभेत जगताप यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. ज्येष्ठ नेते सुभाष गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, माजी सभापती विलास भैलुमे, हरिदास शिर्के, नानासाहेब बोळगे, सरपंच शिवप्रसाद उबाळे, टिळक भोस, सिद्धेश्वर सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, प्रशांत जमदाडे, अनुराधा ठवाळ, सत्यवान शिंदे, हनुमंत डोके, शरद गव्हाणे, किसन रासकर, दीपक भालेराव, तात्या डोके, माऊली काळे, मनोज ठवाळ, माऊली उबाळे, अंबादास चव्हाण, अंजली चव्हाण, सागर वाकडे, सागर नवले, नितीन जमदाडे, दादासाहेब औटी, अनिल औटी, नवनाथ काळाने, रवी जाधव, शेखर गव्हाणे, बापूराव जाधव उपस्थित होते.

राहुल जगताप म्हणाले, राहुल जगताप स्पर्धेत नाही असे विरोधक म्हणत असले तरी ती केवळ अफवा आहे. विकासाच्या मुद्यावर विधानसभेची निवडणूक लढवत आहे. आढळगाव येथील राहुल जगताप यांची सभा रात्री आठ वाजता होती, मात्र इतर गावांतील प्रतिसादामुळे ते साडेनऊ वाजता आढळगावात पोहचले. सभेला उशीर होऊनही कायकर्ते थांबून जगताप यांचे जंगी स्वागत केले. सूत्रसंचालन श्रीकांत ठवाळ यांनी तर नवनाथ सुद्रीक यांनी आभार मानले.आमदार होण्यासाठी हपापलेला नाही. स्वार्थासाठी पक्ष खुंटीला टांगणारा कार्यकर्ता नसल्याचे सांगत जगताप यांनी नागवडेंवर हल्लाबोल केला. त्यांनी निष्ठेला मूठमाती देऊन मशालीची उमेदवारी मिळवली त्यांनी सहा महिन्यात चार पक्ष बदलले. आठ दिवसापूर्वी घड्याळाचा प्रचार करणार्‍यांनी निष्ठेला मूठमाती देत मशाल हाती धरल्याचा घणाघात राहुल जगताप यांनी केला.

शरद पवारांसोबत कायम
विरोधक कोण, याची फिकीर न बाळगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याने त्यांचे आशीर्वाद घेऊनच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. काल ही शरद पवार यांच्यासोबत होतो, आजही आहे अन उद्याही राहील, असे उमेदवार राहुुल जगताप यांनी स्पष्ट केले.

आमदारपुत्र टक्केवारीत अडकले
तालुक्याला टक्केवारीची कीड लागली आहे. आमदारपुुत्रांनी विकासासाठी निधी आणला असा डांगोरा पिटण्याचे काम चालवले आहे. पण ती कामे ठेकेदाराला टक्केवारीचे मोजमाप लावले. त्यामुळे जी कामे झाली त्याची दुर्दशा पहा. टक्केवारीची कीड आता कायमची घालवावी लागणार असल्याचे सांगत जगताप यांनी महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्यावरही हल्लाबोल चढविला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा! दोन अपक्ष बाजी मारणार

महायुती 7, मविआ 3 तर 2 अपक्ष बाजी मारणार! नगर शहरात कमालीची उत्सुकता | श्रीगोंदा,...

शिरसाटवाडी मतदान केंद्रावर काय घडलं?; काय म्हणाल्या आमदार मोनिकाताईं राजळे? वाचा सविस्तर..

पाथर्डी | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे...

अदानी अडचणीत; अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे....

CM पदाबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान; थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या...