spot_img
अहमदनगरमी १० वर्षे ज्यांच्याबरोबर, तेच निकाल लागल्यावर गुलाल घेऊन गेटवर, 'हा' कुठला...

मी १० वर्षे ज्यांच्याबरोबर, तेच निकाल लागल्यावर गुलाल घेऊन गेटवर, ‘हा’ कुठला न्याय?; माजी खासदार डॉ. विखे पाटलांचा सवाल

spot_img

Ahmednagar Politics News: लोकसभेचा कागद पहात असताना येथील दोन्ही बुथ मागे निघाले. लोकसभेला साहेब उमेदवार नव्हते त्यामुळे कदाचित लोकांची मानसिकता नसावी. जे आत्ता सत्तेत आले ते तुमचे घर चालविणारे होते का? की ज्यांनी दहा वर्ष गणेशच्या कर्मचार्‍यांचे घर चालविले त्यांनी कारखाना बंद पडू दिला नाही. दहा वर्षांपूर्वी ज्यांनी तुमचा कारखाना बंद पाडला ते तुमचे कैवारी कसे? असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी केला. रांजणगाव खुर्द येथे आयोजित महिला व पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील म्हणाले, दहा वर्षांपूर्वी ना. विखे यांनी गणेश कारखाना चालवायला घेतला नसता तर एकाही कर्मचार्‍याचा प्रपंच चालला नसता. वाईट एका गोष्टीचे वाटते, 10 वर्षे ज्यांच्याबरोबर मी राहीलो, निकाल लागल्याच्या अर्धा तासातच ते सगळे गुलाल घेऊन गेटवर आले. मी पहात राहिलो. हे तेच लोक होते ज्यांच्याबरोबर आपण 10 वर्ष काम केले. आम्ही केलेला त्याग, परीश्रम गणेश चालविण्यासाठी प्रवरा 50 ते 60 कोटी पाठीमागे गेला. पगार होत नव्हते तेव्हा आम्ही घरातून पैसे दिले. त्यावेळी जिल्हा बँकेचे कारण दिले नाही. कारखाना चालवायला घेतला तेव्हा कोणत्या बँकेच्या आधारावर घेतला नव्हता. स्वतःचा प्रपंच गहाण ठेवून गणेशच्या कर्मचार्‍यांचा प्रपंच चालविला.

तेव्हा आम्ही कधी बँकेने पैसे दिले नाही म्हणून ओरड केली नाही. मग आता का म्हणता बँक पैसे देत नाही. तेव्हा भाषणामध्ये का सांगितले नाही बँकेने मदत नाही केली तर आम्ही कारखाना चालवू शकत नाही. ज्या लोकांनी गुलाल घेतला ते आता कुठे गेले. आमच्याकडे असताना कामगारांचे दोन महिने पगार मागे पडले तर काम बंद. आज सहा सहा महिने पगार नाही तरी काम चालू. मग लोकतांत्रिक प्रक्रीया फक्त विखे पाटलांची सत्ता असल्यावरच. आता जे लोक सत्तेवर आले त्यांच्या कालावधीमध्ये काहीच नाही.

हा कुठला न्याय. सर्वसामान्य माणूस अशाप्रकारे करीत असेल तर यापुढे कोण याबाबतीत विचार कारणार. कारखान्याचे मी मॉडीफीकेशन केले म्हणून हा कारखाना चालला. विखे पाटलांनी गणेश कारखान्यात पैसे गुंतविले म्हणून कारखाना चालला. सत्तेवर आलेल्यांना भाषण करण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही या कारखान्यासाठी किती गुंतवणूक केली? असा ठोक सवाल गणेच्या सत्ताधार्‍यांना डॉ.सुजय विखे पाटील यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...