spot_img
ब्रेकिंगमी निवडणूक लढणार होतो पण…; संभाजीराजेंचं विधान चर्चेत

मी निवडणूक लढणार होतो पण…; संभाजीराजेंचं विधान चर्चेत

spot_img

कोल्हापूर / नगर सह्याद्री –
यंदाची लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांत जाहीर होऊ शकते. त्याआधीच सर्व पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, युती आणि आघाडीतले पक्ष जागावाटपावर चर्चा करत असतानाच कोल्हापूरचे शाहू महाराज द्वितीय यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शाहू महाराज कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेला उभे राहणार आहेत. शाहू महाराजांचे पुत्र आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

संभाजीराजे म्हणाले, माझ्या वडिलांनी लोकसभेला उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना या निवडणुकीत जिंकवण्यासाठी आम्ही सर्वजण १००० टक्के योगदान देऊ. महाराजांचा अनुभव कोल्हापूरला वेगळी दिशा दाखवेल यात काही शंका नाही.

संभाजीराजे छत्रपती यांनी काही वेळापूर्वी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी लोकसभा निवडणूक लढवणार होतो. माझं तसं ठरलं होतं. मी कोल्हापूर किंवा नाशिक मतदारसंघाचा विचार करत होतो. परंतु, माझ्या वडिलांनी निवडणूक लढवायचं ठरवलं आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केल्यावर माझा निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उरत नाही. माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यामुळे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना तयारी करण्यास सांगितलं आहे. मी ही निवडणूक लढवली असती तर माझं शंभर टक्के योगदान दिलं असतं. आता महाराज लढणार आहेत म्हटल्यावर महाराजांसाठी आम्ही १००० टक्के योगदान देऊ.

संभाजीराजे छत्रपतींनी यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, शाहू महाराज कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत? ते मशाल (शिवसेनेचा ठाकरे गट) किंवा हाताचा पंजा (काँग्रेस) यापैकी कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत? कारण, या दोन पक्षांबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. यावर संभाजीराजे म्हणाले, शाहू महारांजांची भूमिका मी मांडू शकत नाही. त्यांची भूमिका तेच स्पष्ट करतील. तसेच कोल्हापूरच्या जनतेलाही महाराज हवे आहेत. महाराज प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु, त्यांच्या उमेदवारीबाबत मविआ नेते काय निर्णय घेणार आणि महाराजांची भूमिका काय असेल ते आपल्याला लवकरच कळेल. मविआचे नेते आणि महाराज योग्य वेळी सर्व गोष्टी स्पष्ट करतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अतिक्रमणांवर हातोडा! ‘त्या’ रस्त्यांचा श्वास मोकळा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- गेल्या आठ दिवसांपासून नगर शहर व उपनगरातील अतिक्रमणांवर कारवाई केली जात...

मास्तर तसलं वागणं बर नव्ह! गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा; अहिल्यानगरमध्ये विद्यार्थीनीचा विनयभंग

Crime News: गेल्या काही दिवसांमध्ये शाळेत मुलींसोबत विनयभंग करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. अशातच...

‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत डॉ. ओंकार शेळके यांचे यश’

पारनेर । नगर सहयाद्री:- नारायणगव्हाण ( ता. पारनेर) येथील युवा बुद्धिबळपटू डॉ. ओंकार नानासाहेब शेळके...

‘श्री. तुळजाभवानी विद्यालयात गणित-विज्ञान, रांगोळी प्रदर्शन’; शिवांजली चोभे, सिद्धी परभणे यांना घवघवीत यश

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन त्यांच्यामध्ये गणित, विज्ञान विषयाची आवड निर्माण...