अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप, राहुरी-नगर विधानसभा मतदारसंघाचे शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, काशीनाथ दाते यांनी विधीमंडळामध्ये शनिवारी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर आमदार संग्राम जगताप समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक झाली. तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाला जाहीर झाला. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप, राहुरी-नगर मतदारसंघातून शिवाजी कर्डिले, शेवगाव-पाथडतून मोनिका राजळे, पारनेर-नगर मतदारसंघातूून काशीनाथ दाते विजयी झाली.
नवर्निवाचित विधानसभा सदस्यांचा शनिवारी शपथविधी पार पडला. मी संग्राम पार्वती आरुणकाका जगताप विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे. अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन.
भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे, ते निष्ठा पूर्वक पार पाडेन. धन्यवाद जय हिंद जय भीम जय श्रीराम. अशी शपथ आमदार संग्राम जगताप यांनी घेतली.