Politics News: आगामी विधानसभेच्या पाश्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने तर २५ उमेदवारांची यादीच जाहीर केली आहे. तर भाजप आपली रणनीती आखण्याचा तयारी मध्ये व्यस्त आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशावर मोठे वक्तव्य केले होते. आता एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये हालचाली दिसून येत आहेत. नाथाभाऊंचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये सामावून घेण्याविषयी भाष्य केले आहे.
भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने (BJP) त्याबाबत घोषणा केलीच नाही. आता या सगळ्याला पाच महिने उलटून गेल्यामुळे मी भाजप प्रवेशाच्या विषयावर फुली मारली आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये सामावून घेण्याविषयी भाष्य केले आहे. एकनाथ खडसे मुलाखतीत काय म्हणाले, ते मी ऐकलं नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला मान्यच आहे. त्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करुन एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.