spot_img
अहमदनगरकान्हूर पठारच्या शिक्षक प्रकरणात माझा संबंध नाही; कोण म्हणाले पहा...

कान्हूर पठारच्या शिक्षक प्रकरणात माझा संबंध नाही; कोण म्हणाले पहा…

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री

कान्हूरपठार येथील वादग्रस्त शिक्षक प्रकरण हे सुमारे एक वर्षांपूर्वीचे आहे. त्याच दरम्यान तक्रारीवरून रयत प्रशासनाने चौकशी समिती नेमून आत्तापर्यंत चार ते पाच शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या बदल्या करून कारवाई केली. या सर्व कारवाई प्रकरणी माझा कुठलाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध आला नाही. त्यावेळी काही ग्रामस्थ व स्कूल कमिटीतील काही सदस्य यांनी शाळा बंद केल्यानंतर विभागीय अधिकारी यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर मुलीचा विनयभंग करणार्‍या शिक्षकावर कारवाई झाली. त्याच्याशीही आणि त्याआधी तक्रारी झालेल्या शिक्षकांशी कोणताही संबंध नसून याबाबत रयत प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित शिक्षक निलंबीत करण्यात आला आहे आणि अन्य शिक्षकांची चौकशी होऊन त्यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याची माहिती ज्ञानदेव पांडुळे यांनी दिली.

ज्ञानदेव पांडुळे यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी कान्हूरपठारच्या प्रकरणाबाबत खुलासा केला आहे. जर्‍हाड शिक्षकाबद्दल मुलींच्या तक्रारीवरून कारवाई करावी यासाठी गावातील लोक आग्रही झाले व उचीत कारवाई पोलिसांनी केली.

त्या दिवशी काही ग्रामस्थांनी आंदोलन केले. या आंदोलनाला विविध कंगोरे आहेत. स्थानिक स्कूल कमिटीचा वाद, ग्रामपंचायत निवडणूक, रयत शिक्षण संस्थेतील माझी व नाराज पदाधिकारी की ज्यांना स्कूल कमिटीतून काढून टाकले होते. त्याचा त्यांना राग होता. त्यामुळे आंदोलन ठिकाणी ग्रामस्थांना चिथावनी देणे, त्याचे रेकॉर्डींग करणे व संस्थेच्या पदाधिकार्‍यांना पठविणे हे काम कोणाच्या सांगण्यावरून करीत होते हे काही कळले नाही. या गावात माझे काही दुखावलेले मित्र जागे झाले व त्यांनी आगीत तेल ओतले व तापल्या तव्यावर पोळी भाजून घेतली. त्यातील ऐक कार्यकर्ता माझ्याविषयी संस्थेकडे तक्रार करत होता. त्यांनी गेल्या आठवड्यात ग्रामपंचायतचा चेक चोरल्याप्रकरणी सरपंचबाईने चोप दिला होता. विषय सोडून काही ग्रामस्थांनी मुद्दामहून वातावरण गडूळ तयार केले.
गोरडे शिक्षकाची बदली झाल्यावर त्याने संस्थेकडे लेखी तक्रार केली, त्यावर संस्थेच्या दोन्ही सहसचिवाने काय भूमीका घेतली या सर्व बाबी रेकॉर्डवर आहेत. त्याला कोणी पाठीशी घातले फेर चौकशीवरून झालेले वादंग व त्यावर संस्थेने त्याचा घेतलेला जबाब यावर झालेला काही निर्णय असेल त्या बाबी संस्थेकडे ऑनरेकॉर्ड आहेत.

याउपर त्याची बदली रद्दसाठी संस्थेकडे कोणत्या उच्च पदस्थांनी फोन केले त्याची संस्थेला माहिती आहे. त्यांनी वकृत्व स्पर्धेला कोपरगावातील मुली नेणेबाबत मी कधीही मुख्यध्यापकला फोन केला नाही. तो त्यांच्या प्रशासनाचा भाग आहे. आपण कधीही तत्कालीन मुख्याध्यापकाला फोन करू शकता व खातरजमा करू शकता. शिक्षण व्यवस्था बहुजनापर्यंत नेण्याच्या प्रक्रियेला कर्मवीर भाऊराव पाटलांने खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा नेले. त्या प्रक्रियेत माजी खासदार शंकरराव काळे, इन्सपेक्टर व्यवहारे साहेब, लांगोरे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर, धोत्रे, किन्ही, बाभुळवेडा, कळस या शाखा काढल्या. तसेच नगर तालुक्यातील खडकी, देवळगाव सिद्धी ता. आष्टी, पिंप्री घुमरी शाळा काढण्यात मोलाचे योगदान दिले. नगर येथील राधाबाई काळे महाविद्यालय स्थापन करण्यात खारीचा वाटा उचलला. यात मी माझ्या संसारकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे माझे वैयक्तीक नुकसान झाले. परंतू तत्वाशी तडजोड केली नाही. शेकडो लोकांचे गरीब वर्गाचे संसार उभे केले. राजकारणातून माझ्यावर झालेल्या आरोपामुळे मला क्लेश झाला. त्याचे फार दुःख झाले. हे करीत असतांना संस्थेची बदनामी होते व जो कार्यकर्ता पस्तीस वर्ष राबला तो मोडून पडेल याचीही त्यांनी फिकीर केली नसल्याचे पांडुळे यांनी म्हटले आहे. घात केला माझा| माझ्याच सद्गुणांनी॥ काटे न टोचले | दगा दिला पाकळ्यांनी ॥ यानुसार रयतच्या शाखा, रयत शिक्षण संस्था यात बदनाम होणार नाही याची दखल घेतली असल्याचेही श्री. पांडुळे यांनी म्हटले आहे.

संस्थेची बदनामी होणार नाही असाच वागलो!
संस्थेची बदनामी होणार नाही, असाच अयुष्यभर वागलो आहे. येथून पुढे वागेन, अशी ग्वाही देत पांडुळे यांनी पुढे म्हटले आहे की, संस्थेकडे माझा खुलासा पाठवीन. ते माझी बाजू ऐकून चौकशीही करतील, परंतू माझी बाजू समजून न घेता कोणताही निर्णय घेणे नैसर्गिक न्यायाला धरून होणार नाही, मला संस्थेनी पदावरून काढण्याचा प्रश्नच नसल्याचेही पांडुळे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“राहुल गांधींना गोळ्या घालू…” ; भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त विधान, काँग्रेसकडून थेट अमित शहांना पत्र

नवी दिल्ली / वृत्तसंस्था काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे माजी नेते आणि...

एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; नांदेड, वाशिममध्ये मोर्चा

नांदेड / नगर सह्याद्री - मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....

पारनेरमध्ये अतिवृष्टीमुळे नऊ मेंढ्या मृत्युमुखी, नेमकं काय घडलं पहा

पारनेर | नगर सह्याद्री गेल्या पंधरा दिवसांपासून पारनेर तालुयात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, ग्रामीण...

धान्य टिकवण्याच्या पावडरने घेतला दोन बालकांचा जीव; आईची प्रकृती चिंताजनक

संतप्त ग्रामस्थांचे टाकळी ढोकेश्वर येथे ठिय्या आंदोलन पारनेर | नगर सह्याद्री नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी येथील धरमवस्तीवर...