spot_img
महाराष्ट्रमी 2014मध्ये मराठा समाजाला 14 टक्के आरक्षण दिलं होतं, पण फडणवीसांनी.. माजी...

मी 2014मध्ये मराठा समाजाला 14 टक्के आरक्षण दिलं होतं, पण फडणवीसांनी.. माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. सध्या शासनही अर्कशासनातही जोरदार तयारी करत आहे. परंतु आरक्षणाबाबत अद्यापही साशंकता आहे. परंतु याच दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ते म्हणाले आहेत की, मी जुलै 2014 मध्ये मराठा समाजाला 14 टक्के आरक्षण दिलं होतं. नव्या सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही. मी ज्या फॉर्मुल्याने मराठा आरक्षण दिलं त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असा दावाही त्यांनी केला. सोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत 16 टक्केच्या ऐवजी 12 टक्के आरक्षण द्यायचा प्रयत्न केला होता. मात्र ती निव्वळ फसवणूक होती, फडणवीसांकडून फसवणूक झाली असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर या आरक्षणाविषयी पहिल्यांदा मी हा प्रश्न हाताळत कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाचा प्रश्न हाताळला. त्यावेळी आम्ही न्यायालयाची सब कमिटी नेमली होती.

यामध्ये मराठा समाजाला क्रिमिलियरची अट टाकून 2014 मध्ये 16 टक्के आरक्षण दिले आणि मुस्लिमांच्या मागासलेल्या लोकांना अशा 50 जाती शोधून 5 टक्के आरक्षण त्याकाळी दिले होते, असं सांगतानाच आमचं सरकार पाडण्यात आलं आणि हे आरक्षण टिकू शकल नाही असंही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...