विधानसभेची पुनरावृत्ती होण्याचे संकेत | जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुजय विखे यांनी कसली पारनेरमध्ये कंबर
राळेगण थेरपाळ | नगर सह्याद्री
ज्या पारनेर तालुक्यातील जनतेला मी चांगल्या आरोग्यासाठी मदत केली, त्या गरीबांच्या आशीर्वादाने मी तीन महिन्यात राज्यात लौकीक मिळवू शकलो. सामान्य जनतेच्या आशीर्वादात प्रचंड ताकद असते. त्यामुळेच मी आज पुन्हा मी उभा आहे आणि त्याच ताकदीने कामाला लागलेलो आहे. पारनेरमध्ये आलो असल्याने मला आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा शेअर मला म्हणावा लागेल आणि तो म्हटल्याशिवाय मी येथून जाणार नाही. ‘मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मै समंदर हूँ, लौटकर वापस आयुंगा!’, असे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
पारनेरमधील एका जाहीर सभेत बोलताना सुजय विखे पाटलांनी ‘मैं लौटकर आयुंगा’, असे जाहीरपणे स्पष्ट केल्याने आता विखे पाटलांची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पारनेरमधील नव्या राजकीय समिकरणांची एक्सप्रेस धावणार हे स्पष्टपणे समोर आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुजय विखे पाटील हे खा. निलेश लंके यांची कोंडी करण्यास सज्ज झाले असल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे. राळेगण थेरपाळ येथील शिवमुद्रा पतसंस्थेचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार काशिनाथ दाते होते. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील,माजी तालुकाध्यक्ष वसंत चेडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा रावडे, भाजपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सोनाली सालके, सुरेशशेठ पठारे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, डॉ. भाऊसाहेब खिलारी, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, माजी सभापती गणेश शेळके, सहाय्यक निबंधक विकास जाधव, दादाभाऊ वारे, दत्ता नाना पवार, दिपक ठोंबरे, सुभाष दुधाडे, राजूशेठ औटी, लहू भालेकर, नगरसेवक युवराज पठारे, निलेश खोडदे, लाभेश औटी, डॉ.श्रीकांत पठारे, सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर, राजेंद्र वाघमोडे, राजेश गोपाळे, अंकुश गुंजाळ, बन्सी बढे, रोहिदास मेसे, असिफ इनामदार, दत्तात्रय कारखिले, पोपटराव कारखिले, अंकुश गुंजाळ, बाबाजी लंके, माऊली वरखडे, अस्लमभाई इनामदार, प्रतिक वरखडे, विलासराव हारदे आदी तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच व विविध संस्थाचे पदाधिकारी व संचालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू साबळे यांनी केले शेवटी बाबाजी ठुबे यांनी आभार मानले.
हायफाय संस्कृतीमुळे पतसंस्था चळवळ अडचणीत
पतसंस्था सुरू केल्यानंतर संबंधित पदाधिकारी ईमारत, फर्निचर, एसी त्यांनतर निवडणूकीची हवा यासारखी हायफाय संस्कृती तयार करतात आणि त्यामुळे पतसंस्था चळवळ अडचणीत येत असल्याच्या कानपिचक्या डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्या.
पंकज कारखिले सक्षम अन् मोठ्या मनाचे नेतृत्व!
सरपंच पंकर कारखिले यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या शिवमुद्रा पतसंस्थेला शुभेच्छा देतानाच चेअरमन पंकज कारखिले हे एक सक्षम नेतृत्व असून मोठ्या मनाचा माणूस आहे. पतसंस्था हायफाय न करता या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आर्थिक आधार देण्याचे काम पंकज आणि त्याचे सहकारी करतील असा विश्वास सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. ठेवी व वसुली तसेच शिस्तबद्ध कारभार करीत कारखिले व त्यांचे सर्व सहकारी शिवमुद्रा पतसंस्थेच्या माध्यमातून अधिक सेवाभाव करतील असा विश्वास माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यातील जनतेने सुज्ञपणे मतदान केल्याने दाते सर आमदार!
जनतेचे पाठबळ व व्यासपीठावर असलेल्या नेतेमंडळींनी विधानसभा निवडणुकीत एकसंध होऊन काम केल्याने दाते सर आमदार झाले. तालुक्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत आपला तालुका सुजलाम सुफलाम झाला पाहिज. सुसंस्कृतपणे लोकप्रतिनिधी यांनी काम केले पाहिजे ही मानसिकता जनतेची होती म्हणून एका चांगल्या नेतृत्वला दाते सर यांच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली आहे. सुज्ञपणे मतदान केल्याने दाते सर आमदार झाले असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
परोपकार जपणाऱ्या पंकजचा आदर्श घेण्याची गरज!
राळेगण थेरपाळ गावचे लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करताना पंकज कारखिले यांनी या परिसरात विशेष करुन निघोज पंचायत समिती गणात सर्वाधिक कामे केली. स्वतः मोठेपणा न घेता इतरांना मोठे करीत विकासाच्या कामांना प्राधान्य दिले. अशाप्रकारे एक समाजकारणी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंकज कारखिले असून त्याचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे गौरवोद्गार सुजय विखे पाटील यांनी काढले.
कुकडी डाव्या कालव्याची दोनशे कोटींची कामे होणार!
राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कुकडी डावा कालव्याची कामे माग लागणार आहेत. येत्या दोन वर्षांत दोनशे कोटी रुपयांची कामे माग लागतील. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे पाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात पुर्ण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नशील आहेत. पाण्याबाबत जिल्हा स्वयंपूर्ण होईल अशी ग्वाही माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.
सुजय विखे पाटील हेच आमचे खासदार: आ. काशिनाथ दाते
धनंजय गाडगीळ व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळ निकोप करण्यासाठी राज्यात सर्वाधिक योगदान दिले आहे. डॉ.सुजय विखे पाटील हेच आमच्यासाठी खासदार असल्याचे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते यांनी यावेळी केले. कुकडी डावा कालव्याला उन्हाळ्यात पाणी मिळण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले असल्याचेही आ. दाते यांनी स्पष्ट केले.
पंकज कारखिले यांना चांगले दिवस : आ. काशिनाथ दाते
पतसंस्था चळवळ अडचणीत आल्यानंतर खाजगी सावकारांनी सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केली. याला प्रतिबंध बसावा यासाठी शिवमुद्रा पतसंस्थेच्या माध्यमातून चेअरमन पंकज कारखिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पतसंस्था चळवळ बळकट करण्यासाठी व जनतेला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी मोठे धाडस केले आहे. त्यांचा प्रामाणिकपणा ,सचोटी, जिद्द व लोकांची विश्वासहर्ता यावर ते नक्की यशस्वी होतील. सरपंच म्हणून काम करताना पंकज कारखिले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,मा. खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सर्वाधिक विकासकामे केली आहेत. मी जिल्हा परिषद सभापती असताना कारखिले यांनी सातत्याने पाठपुरावा करीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे जिल्हा परिषद माध्यमातून माग लावली अशाप्रकारे एक उत्तम राजकारणी व युवा नेतृत्व म्हणून पंकज कारखिले यांना चांगले दिवस आहे, विखे पाटील कुटुंबाचा आशीर्वाद आणी जनतेचे पाठबळ यावर ते आगामी राजकीय भुमिकेत यशस्वी होतील अशी खात्री आमदार दाते सर यांनी व्यक्त केली.
पंकज हा जनसामान्यांचा आधारस्तंभ: सुजित झावरे
सरपंच पंकज कारखिले यांच्या कामाचे कौतुक करताना जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी या भागातील जनसामान्यांचा आधारस्तंभ म्हणून कारखिले व त्यांच्या सहकाऱ्यांचे काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगितले.