मला ऐकण्यासाठी राज्यातील जनता वाट पाहत असायची श्रीगोंद्यातील जनतेने माझ्यावर
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
मुलाप्रमाणे प्रेम दिले असेच प्रेम विक्रमवर करा तुम्हाला कधी पश्चाताप करायची वेळ येणार नाही. असे भावनिक आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथील सभेत बोलताना केले.
भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या प्रचरानिमित व आमदार म्हणून शेवटचे भाषण करण्यासाठी सभा आयोजित केली होती सभेच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते पोपट खेतमाळीस होते यावेळी पुढे बोलताना आमदार बबनराव पाचपुते यांनी आपल्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सत्तेचा वापर आपण सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केला कधी कोणाची जात पाहुण कामे केली नाहीत मला सर्व तालुका कुटुंबासारखा आहे . एकेकाळी राज्यातील जनता ही माझे भाषण ऐकण्यासाठी थांबून राहत होते. मला राज्यात पक्षात खुप मान सन्मान मिळाला त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील जनतेला मला मुलाप्रमाणे प्रेम दिले. तसेच प्रेम विक्रम ला द्या तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही. जर काही अडचणी आल्या तरी माझ्याकडे या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठी आहे असे भावनिक आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले.
तर प्रतिभा पाचपुते म्हणाल्या आमच्या घरात भांडणे लावण्याचे काम काहींनी केले. पण आमच्या वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत माझ्या दोन्ही मुलांनी कधी कोणाला शिवी दिली नाही.
उमेदवारी नाकारली कारण मला पती बबनराव पाचपुते यांची तब्बेत महत्वाची आहे जर मी निवडणूक लढले असते तर जनतेला ही पुर्ण वेळ देऊ शकत नव्हते. म्हणून विक्रम ला पक्षानेच उमेदवारी दिली आहे.
दादांच्या आवाजावर खा. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सौ. पाचपुते म्हणाल्या दादांचा आवाज गेला नाही तर १९८०चा आवाज विक्रम च्या माध्यमातून तुमच्या कानावर पडत आहे. यावेळी उपस्थित सर्व भावनिक झाले होते. दादांची इज्जत आता तुमच्या हातात आहे विक्रम ला मी तुमच्या ओटीत टाकत आहे अशी भावनिक साद प्रतिभा पाचपुते यांनी घातली.
तर विक्रम पाचपुते म्हणाले. ही सभा माझी नाहीच ही आमदार बबनराव पाचपुते यांची आहे.
होय माझ्यावर गुन्हे दाखल आहेत पण कारखान्याचा चेअरमन म्हणून दाखल आहेत विक्रम पाचपुते गुन्हे गार म्हणून एकही गुन्हा दाखल नाही.
मी निवडणूक लढवताना आरोप करतात मी तालुक्यातून गायब होणार आहे पण आता तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकणार आहात त्यामुळे मी गाव तालुका सोडून कुठेच जाणार नाही. ही निवडणूक मी विकासावर लढवत आहे तर विरोधक माझ्या कुटुंबावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत मला एकदा संधी द्या तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही असे विक्रम पाचपुते म्हणाले.
यावेळी अरुण पाचपुते. भगवान पाचपुते. संतोष लगड. शहाजी हिरवे.मिलींद दरेकर. गणपत काकडे. गोरख घोडके. संतोष ठोंबरे. आदेश शेंडगे. भाऊसाहेब मांडे हौसराव भोस. भुषण बडवे.आदी उपस्थित होते यावेळी तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी प्रास्ताविक केले. तर आभार बाळासाहेब महाडिक यांनी मानले. या सभेत अतिशय भावनिक वातावरणात निर्माण झाले होते. सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
नाहाटा पानसरे व्यासपीठावर
महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाळासाहेब नाहाटा व दत्तात्रेय पानसरे हे आज विक्रम पाचपुते यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले होते
जुन्या सहकार्यांची आ पाचपुते यांच्याकडून आठवण. …
आजच्या भाषणात आ. बबनराव पाचपुते यांची त्यांच्या सुरुवातीच्या काळात ज्या सहकारी मित्रांनी मदत केली त्यांची भाषणात आठवत काढत नामोल्लेख केला.
दादा आमचा भाऊ-खेतमाळीस आमदार बबनराव पाचपुते यांच्या बरोबर ४५वर्ष एकनिष्ठ राहिलो आहे सख्खे भाऊ एकत्र राहत नाही पण बबन दादा आमच्या भावाप्रमाणे आहेत व आयुष्यभर प्रेमाने वागले.
दारु दुकाने हाच विकास-शिंदे
राहुल जगताप यांच्या कार्यकाळात 2014/ 2019 मध्ये फक्त स्वतःच्या विकास केला 5 ते 6 दारू दुकाने , गोव्यात आलिशान हॉटेल हाच का विकास त्यांना जनतेने संधी दिली मग त्यांनी कोणता विकास केला असे शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा मीरा शिंदे म्हणाल्या
कुटुंबात वाद नाही – पाचपुते
दादांच्या आजारपणात मला त्यांची सेवा करायची आहे व प्रतेक आईला आपला मुलगा मोठा व्हावा ही इच्छा असते व विरोधक म्हणतात विक्रमसिंह ला उमेदवारी नाही मिळाली म्हणुन तो नाराज झाला व आमच्या घरात भांडणे चालू झाली असे म्हणताना त्यांना लाज वाटली पाहिजे माझे दोन्ही मुलानी कधीही कोणाला शिवी दिली नाही मग विरोधकांना तो गुन्हेगार कसा दिसतो ज्या चांगल्या रोड वरुण ते जातात जाताना जी हिरवी शेती दिसतेय ना तो विकास आहे असे प्रतिभा पाचपुते म्हणाल्या.
एक संधी द्या पाणी कमी पडू देणार नाही- विक्रम पाचपुते
घोड कुकडी विसापूर सीना धरणावर सिंचन अवलंबून आहे पण एकदा संधी द्या पाणी कमी पडु देणार नाही असे विक्रम पाचपुते म्हणाले.