spot_img
ब्रेकिंग'मी निर्दोष...! वाल्मिक कराड तुरुंगातून सुटणार? कोर्टातून आली मोठी अपडेट

‘मी निर्दोष…! वाल्मिक कराड तुरुंगातून सुटणार? कोर्टातून आली मोठी अपडेट

spot_img

Walmik Karad: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटल्यात महत्त्वाची घडामोड घडली आहे. आज केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या दुसऱ्या सुनावणीत मुख्य आरोपी वाल्मिक कराडने मोठा दावा करत, आपल्या निर्दोषतेचा अर्ज न्यायालयात सादर केला. या सुनावणीकडे संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलेलं होतं. वाल्मिक कराडसह महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे यांना या प्रकरणात अटक झाली आहे, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, काही गोपनीय साक्षीदारांच्याही जबाबांची नोंद झाली आहे.

आज कोर्टात वाल्मिक कराडने अर्ज सादर करत सांगितलं की, “माझ्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. खंडणी मागितल्याचा आरोपही सिद्ध झालेला नाही. त्यामुळे मला या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावं. त्याच्या अर्जावर पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे. त्या दिवशी सरकारी पक्ष आपली बाजू मांडणार आहे.सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांनी युक्तिवाद केला. सुनावणीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आज आरोपी वाल्मिक कराडने काही कागदपत्रांची जंत्री मागितली होती, ती न्यायालयात सादर करण्यात आली आहे. त्याने पुन्हा एकदा दोषमुक्ततेची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, न्यायालयात संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सादर करण्यात आला आहे. तसेच, वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यासाठी मोक्का कायद्यानुसार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या खटल्यात आरोपींविरोधात अजूनही आरोप निश्चित झालेले नाहीत, अशी माहिती अॅड. निकम यांनी दिली. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत आरोप निश्चिती आणि तपास यंत्रणांचे सादरीकरण यावरून या खटल्याला नवे वळण मिळू शकते. आरोपींच्या मुक्ततेबाबतचा निर्णय २४ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...