spot_img
ब्रेकिंगमी लढण्यासाठी खंबीर! नव्या सरकारच्या विरोधात जरांगे पाटलांचे उपोषण; मागण्या कोणत्या? वाचा...

मी लढण्यासाठी खंबीर! नव्या सरकारच्या विरोधात जरांगे पाटलांचे उपोषण; मागण्या कोणत्या? वाचा एका क्लिकवर

spot_img

Manoj Jarange Patil; मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी लढा दिला. त्यांनी आमरण उपोषण केले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज आमरण उपोषणाला बसणार आहे. आंतरवाली सराटी स्थगित केलेले उपोषण मनोज पाटील पुन्हा एकदा सुरू करणार आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या 18 महिन्यापासून आंदोलन करीत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत सहा वेळा आमरण उपोषण केले असून एकदा मुंबई वारी देखील केली आहे. आता पुन्हा नवीन सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील सातव्यांदा आजपासून आमरण उपोषणासाठी अंतरवाली सराटीत बसणार आहे.

महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे,हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर,बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर,लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, मा. न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे . मा. शिंदे समितीला एक वर्ष मुदत वाढ द्यावी, सगे- सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी आम्ही दिलेल्या व्याख्या प्रमाणे सगे- सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस सरसकट सर्वांच्याच मागे घेण्यात याव्यात. सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे, सरकारने 10 टक्के sebc आरक्षण लागू केले आणि मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केले ते ईडब्लूएस आरक्षण पुन्हा सुरू करावे.

कुणबी नोंदी शोधण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ,कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडीटी देण्यासाठी, जिल्हा व तालुकास्तरावर कक्ष स्थापन केले होते ते कक्ष पुन्हा तात्काळ सुरू करण्यात यावे .वंशावळ समिती मोडी लिपी समिती व सर्व भाषेचे अभ्यासक यांची मोठी टीम तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करण्यात यावी, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग आहे म्हणजेच कुणबी आहे. ओबीसी क्रमांक 83 वर कुणबी आहे. आणि 2004 सालीचा अध्यादेश आहे. म्हणजेच मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठ्यांची पोटजात -उपजात कुणबी आहे. म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे .हा सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...