spot_img
ब्रेकिंगपतीने केले पत्नीचे सिनेस्टाईल अपहरण! धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

पतीने केले पत्नीचे सिनेस्टाईल अपहरण! धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

spot_img

Crime News: प्रेमविवाह केला, पण लग्नाच्या दोन महिन्यांतच नवऱ्याची ‘सिने स्टाईल’ मेंटॅलिटी उफाळून आली. पत्नी माहेरी गेली म्हणून सिन्नर तालुक्यातील वैभव पवार याने पत्नी कल्याणी दळवी हिचं थेट अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना 19 मार्च रोजी सिन्नरच्या पांगरी गावात घडली. पत्नीवर राग आल्यामुळे वैभवने चारचाकी गाडी घेऊन मित्रांसह गावात धडक दिली आणि सासू समोरच पत्नीवर झडप घेत, तिला जबरदस्तीने गाडीत कोंबलं आणि अपहरण केलं. कल्याणी दळवी हिने 20 जानेवारी 2025 रोजी वैभव पवारसोबत प्रेमविवाह केला होता. पण लग्नानंतर वैभवने तिला मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे 8 मार्चला कल्याणी माहेरी परतली. याचा राग मनात ठेवून वैभवने अपहरणाचा कट रचला. 19 मार्च रोजी कल्याणी आपल्या आई आणि भावासोबत पांगरी इथे आली असताना, अचानक वैभव आपल्या मित्रांसह गाडीने आला.

त्याने तिला गाडीत अपहरणानंतर वैभवने कल्याणीला संगमनेरमार्गे लोणीपर्यंत नेले. तेथून दोघं शिर्डीच्या दिशेने पायी जात असताना पोलीसांना संशय आला आणि चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. कल्याणीने पोलिसांना आपल्या अपहरणाची आणि छळाची संपूर्ण माहिती दिली. तिच्या तक्रारीवरून पती वैभव पवार आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे आणि सहायक निरीक्षक गणेश शिंदे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा, झेडपी निवडणुकांचा ढोल वाजला

फेर प्रभाग रचना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश मुंबई | नगर सह्याद्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला निवडणुकीचा प्लान!, युती होणार नाही, त्या..

Maharashtra politics: चार महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे कोर्टाने आदेश...

अर्बन बँक घोटाळा प्रकरण: पुन्हा महत्वाची अपडेट,आरोपींवर कारवाई करा! मुख्यमंत्र्यांनाकडे कोणी केली मागणी? पहा..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - नगर अर्बन (मल्टीस्टेट) को-ऑप. बँक (अहमदनगर) अहिल्यानगर ही नगर जिल्ह्यातील...

‘अहिल्यानगर मनपा आरोग्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय...