spot_img
महाराष्ट्रपती-पत्नीवर भररस्त्यात गोळीबार, कुठे घडला प्रकार पहा

पती-पत्नीवर भररस्त्यात गोळीबार, कुठे घडला प्रकार पहा

spot_img

सोलापूर | नगर सह्याद्री

जिल्ह्यातील मोहोळ तालुयात पूर्ववैमनस्यातून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मोहोळ तालुयातील रोपळे येवती मार्गावर ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दशरथ केरू गायकवाड या व्यक्तीच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.

शिवाजी पुंडलिक जाधव (वय ६५) आणि त्यांची पत्नी सुरेखा शिवाजी जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्यांची नावे आहेत. शिवाजी जाधव यांना एक गोळी तर सुरेखा जाधव यांना तीन गोळ्या लागल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे. महिलेवरती रूग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवती येथील शिवाजी जाधव व त्यांच्या पत्नी सुरेखा असे दोघे मिळून पंढरपूर येथे चैत्रीवारीनिमित्त दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रोपळे मार्गे दुचाकीवरून येवतीकडे येत असताना, त्यांच्याच गावातील दशरथ केरू गायकवाड याने जुन्या भांडणाच्या रागातून पिस्तुलातून जाधव पती-पत्नीवर गोळ्या झाडल्या.

त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गायकवाड याने केलेल्या राऊंड फायरमध्ये सुरेखा जाधव या गंभीर जखमी झाल्या. तसेच शिवाजी जाधव हे पण जखमी झाले. घटनेनंतर तत्काळ ग्रामस्थांनी त्यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत फायर झालेले व फायर न झालेले राऊंड मॅझिन जप्त केले. दरम्यान, घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा, ठसे तज्ज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनेनंतर संशयित आरोपी दशरथ गायकवाड फरार झाला आहे. त्याच्या तपासासाठी दोन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिसांकडून सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निळवंडे कालव्यांच्या आवर्तनाबाबत मोठी अपडेट; जलसंपदामंत्री विखे पाटील म्हणाले…

लोणी / नगर सह्याद्री - निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना रविवार दि. 20...

जेवणात विष मिसळून 5 जणांचा जीव घेणाऱ्या सुनेला जन्मठेप; कशी घडली होती घटना

रायगड / नगर सह्याद्री : रायगडमधील महाड गावामध्ये घडलेल्या विषबाधा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर...

उधारीच्या पैशांवरून राडा; तरूणासोबत घडले असे…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शिराढोण (ता. अहिल्यानगर) शिवारात उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका तरूणावर...

हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आक्रमक; म्हणाले, तर संघर्ष अटळ…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना...