इगतपुरी । नगर सहयाद्री
तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या घोटी शहरातील सुधानगर येथील पती-पत्नीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल (बुधवारी) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.
बुधवारी सायंकाळी नाशिकहुन इगतपुरीकडे जाणाऱ्या रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेखाली दिनेश देविदास सावंत (वय ३८) आणि विशाखा दिनेश सावंत (वय ३३) यांनी उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. त्यानंतर या घटनेची माहिती देविदास देवाजी सावंत यांनी घोटी पोलिसांना दिली.
दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.