spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये आढळला मानवी सांगाडा! शेजारी सापडले असे काही...? नागरिकांमध्ये उडाली खळबळ

अहमदनगरमध्ये आढळला मानवी सांगाडा! शेजारी सापडले असे काही…? नागरिकांमध्ये उडाली खळबळ

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री-
तालुक्यातील धामणगाव शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या इसमास मानवी शरीराचा सापळा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एखादा व्यक्ती हरवलेली आसेल तर त्यांनी खर्डा पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन खर्डा पोलीसांनी केले आहे.

सचिन सदाशिव नंदिरे ( रा. धामणगाव ) हे नेहमीप्रमाणे शेळ्या चालण्यासाठी वनदरा धामणगाव परिसरात गेले असता त्यांना अज्ञात मानवाची कवटी व मानवी शरीराचा सापळा दिसून आला. यासंदर्भात त्यांनी धामणगाव चे सरपंच महारुद्र महारनवर यांना माहिती यंत्रे त्यांनी खर्डा पोलीस स्टेशन येथे संपर्क करत सदरची माहिती खर्डा पोलीसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल रावसाहेब नागरगोजे, पोलिस कॉन्स्टेबल संजय जायभाय, विष्णू आवारे, पंडित हंबर्डे, बाळासाहेब खाडे, गणेश बडे यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळ गाठत मानवी सापळा व सांगाडा ताब्यात घेतला. मृत व्यक्तीचे अंदाजे वय ३० ते ४० असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सदर सापळ्याच्या शेजारी लाल चौकड्या रंगाचा शर्ट, काळा कलरची पॅन्ट व काळसर जर्किन आढळून आले संबंधित कपड्याच्या वर्णन किंवा अज्ञात कोणी व्यक्ती हरवला असेल तर खर्डा पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय झंजाड करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...