संगमनेर । नगर सहयाद्री:-
शहरातील एका मॉल शेजारी असणार्या कॅफेत एका विवाहित महिलेचा विनयभंग झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक वीस वर्षीय विवाहित महिला शिक्षणासाठी आपल्या मामाकडे आलेली होती. मामाची टपरी असल्याने ही टपरी मामाने हूजेब आदाम शेख याला भाड्याने दिली होती. हुजेब शेख याचे मामाच्या घरी येणे-जाणे असल्याने हुजेब याची मागील एक महिन्यापासून विवाहित महिलेची तोंड ओळख झाली होती.
हुजेब शेख याने महिलेला फोन करून म्हणाला मला तुझ्या सोबत बोलायचे आहे, तु आता मॉल शेजारी असणार्या कॅफेत ये, तेव्हा महिला संगमनेर कॉलेज येथून हुजेब शेख याने सांगितल्याप्रमाणे मॉल शेजारी असणार्या कॅफेमध्ये आली. तेथे कॅफेत बसलेले असताना हुजेब याने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने ती घाबरली.
तेव्हा तिने तिच्या मामाला घडलेला प्रकार फोन करुन सांगितला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी हुजेब आदम शेख याचे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक फडोळ करत आहेत.