spot_img
ब्रेकिंगहुडहुडी कायम!! हवामान खात्याचा 'असा' अंदाज, ३१ जानेवारी नंतर...

हुडहुडी कायम!! हवामान खात्याचा ‘असा’ अंदाज, ३१ जानेवारी नंतर…

spot_img

नागपूर | नगर सह्याद्री
महाराष्ट्रात जानेवारी अखेरपर्यंतच थंडी राहील आणि त्यानंतर मात्र तापमानात वाढ होऊन थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, असा अंदाज होता. आता मात्र थंडीने आपला मुक्काम वाढवला आहे आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील थंडी कायम असणार आहे. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यामुळे राज्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे.

मागील आठवड्यापासून सातत्याने किमान तापमानात घसरण सुरू आहे. परिणामी आता खर्‍या अर्थाने हिवाळा असल्याचे जाणवत आहे. मात्र, हा थंडीचा मुक्काम जानेवारीच्या अखेरीस संपणार असा अंदाज असताना आणखी दहा दिवस तो वाढला आहे. सध्या दिवसा हलकेसे ऊन जाणवायला लागले असले तरीही सायंकाळपासून थंडीची चाहूल लागते.

पहाटे थंडीत आणखी वाढ होते. विदर्भात मागील आठवड्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाले होते. तर आतासुद्धा ते १४ अंश सेल्सिअसच्या आतच आहे. कमाल तापमानात वाढ असली तरी किमान तापमानातील घट कायम आहे. उपराजधानीसह गोंदिया, भंडारा, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमानात घट होत आहे.

दरम्यान, ३१ जानेवारीनंतर थंडीत आणखी वाढ होईल असा अंदाज आहे. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍याचा परिणाम राज्यावर आठ फेब्रुवारीपर्यंत कायम राहील. तर बाहेरच्या देशातून येणार्‍या थंड वार्‍याचा प्रभाव देखील असणार आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर थंडीचा मुक्काम १५ फेब्रुवारीपर्यंत वाढू शकतो.

सध्या सकाळच्या वेळी काहीसे ढगाळ वातावरण आहे, पण पावसाची सध्यातरी शयता नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात पण गरम कपड्यांची आवश्यकता भासणार आहे. दरम्यान, उशिरा का होईना थंडीची चाहूल कायम असल्याने सर्वसामान्य त्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...