spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यात कशी होणार मतांची मोजणी? जाणून घ्या संपूर्ण ABCD..

अहिल्यानगर जिल्ह्यात कशी होणार मतांची मोजणी? जाणून घ्या संपूर्ण ABCD..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे काउंटडाऊन सुरू होणार आहे. उद्या, म्हणजेच शनिवार दि.२३ रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत निकाल लागतील. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदार संघाच्या निकालांकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतांची मोजणी कशी केली जाते? मतमोजणीच्या दिवशी नेमके काय होते? कोण मते मोजतो? मतमोजणीनंतर EVM चे काय होते? अशी अनेक प्रश्ने तुमच्या मनात आली असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पहाणार आहोत.

14 टेबलची व्यवस्था
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून उद्या शनिवारी जिल्ह्यातील 12 मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. साधारण एका मतदारसंघासाठी 100 ते 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून या सर्वांना आज (शुक्रवारी) मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात मतदान केंद्राच्या संख्येनूसार मतदानाच्या फेर्‍या ठरणार असून प्रत्येक ठिकाणी मोजणीसाठी 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रात मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 डेबल लावण्यात येणार आहेत. यासह सैनिक व पोस्टल मतांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत. प्रत्येक ठिकाणच्या मतमोजणीसाठी 100 ते 150 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कर्मचार्‍यांना आज मोजणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू करण्यात येणार असून साधारणपणे दहाव्या फेरीपासून निकालाचा प्राथमिक कल हाती येणार आहे.

कशी होणार मतमोजणी?
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. यावेळी प्रत्येक पक्षाचे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता स्ट्राँग रूमचे कुलूप उघडले जाते. यावेळी निवडणूक आयोगाचे निवडणूक अधिकारी आणि विशेष निरीक्षकही उपस्थित असतात. या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ शूट केला जातो. त्यानंतर इव्हीएमचे कंट्रोल युनिट मतमोजणी टेबलावर आणले जाते. या प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग केले जाते. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाते. टेबलावर ठेवल्यानंतर प्रत्येक कंट्रोल युनिटचा युनिक आयडी आणि सील जुळतात. प्रत्येक उमेदवाराच्या पोलिंग एजंटलाही ते दाखविले जाते. त्यानंतर कंट्रोल युनिटमधील बटण दाबल्यानंतर प्रत्येक उमेदवाराचे मत त्याच्या नावापुढे इव्हीएममध्ये दिसू लागते.

जिल्ह्यात सर्वाधिक मतमोजणीच्या फेर्‍या
जिल्ह्यात सर्वाधिक मतमोजणीच्या फेर्‍या या शेवगाव आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी 26 अशा होणार आहेत. तर श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड प्रत्येकी 25 फेर्‍या होणार असून राहुरी, श्रीरामपूर आणि अकोले मतदारसंघात प्रत्येकी 22 फेर्‍या होणार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मतमोजणीसाठी वेळ या चार मतदारसंघांत लागणार आहे. उर्वरितमध्ये नगर शहरात 21 फेर्‍या, संगमनेर 21 फेर्‍या, नेवासा 20 फेर्‍या तर शिर्डी आणि कोपरगाव मतदारसंघात प्रत्येकी 19 फेर्‍या होणार आहेत.

मतमोजणी केंद्राचे ठिकाण

अकोले- तहसील कार्यालय नवीन इमारत

संगमनेर – भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल

शिर्डी – प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राहाता

कोपरगाव – सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल

श्रीरामपूर – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय

नेवासा – न्यू गव्हर्न्मेंट ग्रेन गोडाऊन, मुकुंदपुरा, नेवासा फाटा

शेवगाव – शासकीय इमारत तहसील कार्यालय शेवगाव

राहुरी – रामदास पाटील धुमाळ न्यू आर्टस कॉलेज, राहुरी

पारनेर – औद्यागिक प्रशिक्षण संस्था, पारनेर

अहमदनगर शहर – वेअर हाऊस गोडाऊन एमआयडीसी, नागापूर

श्रीगोंदा – गव्हर्न्मेंट ग्रेन गोडाऊन, पेडगाव रोड

कर्जत जामखेड – दादा पाटील महाविद्यालय, कर्जत.

मतमोजणी कक्षात कुणालापरवानगी?
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मतमोजणी कक्षात प्रत्येक हॉलच्या प्रत्येक टेबलवर उमेदवाराकडून एका प्रतिनिधीला जाण्याचा परवानगी असते. एका हॉलमध्ये 15 पेक्षा जास्त प्रतिनिधी जाऊ शकत नाहीत. प्रत्येक उमेदवार आपल्या प्रतिनिधीची निवड करतात. निवडणूक अधिकाऱ्यांना आपल्या प्रतिनिधीचं नाव, फोटो आणि आधार कार्ड देतात. याशिवाय मतदान केंद्रात मतमोजणी कर्मचारी, निवडणूक अधिकारी, सुरक्षा कर्मचारी यांना जाण्याची परवानगी असते. जोपर्यंत मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणालाही बाहेर जाण्याची परवानगी नसते. निकालाच्या अधिकृत घोषणेनंतर जर एखाद्या प्रतिनिधीला मजमोजणीबाबत संशय असल्यास तो पुन्हा मतमोजणीची मागणी करु शकतो. निवडणूक अधिकारी प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांचा डेटा गोळा करुन निकाल जाहीर करतात. जो उमेदवार जिंकतो त्याला विजयाचं प्रमाणपत्र दिलं जातं.

मतमोजणीनंतर ईव्हीएमचं काय होतं?
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम पुन्हा स्ट्राँग रुममध्ये ठेवले जातात. नियमानुसार, मतमोजणीनंतर 45 दिवस ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये ठेवले जातात. कारण कोणताही उमेदवार पुन्हा मतमोजणीची मागणी करु शकतो. त्यामुळे एखाद्या उमेदवाराने तशी मागणी केली तर मतांचा मोजणी पुन्हा केला जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम दुसऱ्या ठिकाणी पाठवले जातात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये खळबळ! मतपेट्या आणलेल्या बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी...

उमेदवारांची धाकधूक वाढली! नगरमध्ये कुणाच्या अंगावर पडणार गुलाल…

विधानसभेच्या परिक्षेचा शनिवारी निकाल | समर्थकांकडून गुलालाची तयारी | चौकाचौकात दावे प्रतिदावे अहिल्यानगर | नगर...

भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात; संगमनेरमध्ये झळकले फ्लेक्स

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून आता वेध लागलेत ते निकालाचे....

शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; कुठे घडली घटना

छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री:- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका 31 वषय महिलेवर...