spot_img
ब्रेकिंगनगरमध्ये कसा असणार पाऊस? हवामान विभागाने दिली मोठी माहिती, वाचा सविस्तर

नगरमध्ये कसा असणार पाऊस? हवामान विभागाने दिली मोठी माहिती, वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा इशारा दिला असून, या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तसेच पुणे, नाशिक, नगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

यासोबतच धुळे, नंदूरबार, जळगाव, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांतही विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेल्या जिल्ह्यांतील प्रशासन सतर्क झाले आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

खड्ड्यांतून मार्ग काढताना नागरिकांची कसरत
राज्यभरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहे. आणि जसा पावसाळा सुरू झाला तसा अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांची दूर अवस्था समोर यायला लागलेली आहे. खड्ड्यांनी अक्षरशः रस्त्याची चाळण केल्याचे चित्र पाहायला मिळत असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...