spot_img
अहमदनगरनगर जिल्ह्यातील 'ते' धरणं तुडूंब! कुठल्या धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर..

नगर जिल्ह्यातील ‘ते’ धरणं तुडूंब! कुठल्या धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर जिल्ह्यातील शेती, व्यापार, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांना वरदान ठरलेल्या नगरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील सर्व धरणं तुडूंब झाल्याने आगामी रब्बीचा हंगाम जोरात होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. २६००० दलघफू क्षमतेचे मुळा धरण १०० टक्के भरले आहे. या धरणातून ३७०० क्युसेकने पाणी सध्या सोडण्यात येत आहे.११०३९ दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणही तुडूंब आहे. या धरणाच्या पाणलोटात सध्या पाऊस सुरू असल्याने भंडारदरा ४०, घाटघर ७७, पांजरे ४४, रतनवाडी ७४, वाकी ६२ मिमी पाऊस झाल्याने गत पाण्याची आवक झाली. या धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे.

या धरणातील पाणीसाठा ८३२८ दलघफू झाला होता. हे धरण पूर्ण क्षमतेचे भरल्याने प्रवरा नदीत १८१ क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. १०६० दलघफू क्षमतेचे आढळा धरणही १०० टक्के झाले आहे. मांडओव्हळ, सीना, खैरी आणि विसापूर या धरणातील पाणीसाठाही १०० टके आहे. अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील ८०० दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणही तुडूंब आहे. आंबित, वाकी तसेच अन्य छोटे तलावही भरलेले आहेत.

यंदा नगर जिल्ह्यात पाणीच पाणी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.कुकडी प्रकल्प पुणे जिल्ह्यात, या धरणाच्या पाण्याचा लाभ दक्षिण नगर जिल्ह्याला होतो. या प्रकल्पातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले डिंभे धरण १०० टक्के भरलेले आहे. या धरणात १२४९० दलघफू पाणी आहे. घोड धरणही पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. कुकडीच्या अन्य धरणातही समाधानकारक साठा आहे.

दारणा, गंगापूर, मुकणे ही धरणं नाशिक जिल्ह्यात आहेत. याही धरणाच्या पाण्याचा लाभ गोदावरी नदीच्या माध्यमातून कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा आणि शेवगावला होतो. ही धरणंही १०० टक्के भरली आहेत. यंदा पाणलोटात जोरदारपाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाली. परिणामी नांदूरमधमेश्वरमधून गोदावरी नदीत १३५०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. मुळा धरणातून नदीत ३७०० क्युसेकने पाणी सुरू आहे. प्रवरा नदीही कमी अधिक क्युसेकने वाहती आहे. यंदा जिल्ह्यात मुबलक पाणी असल्याने कोणतेही संकट न आल्यास रब्बीचा हंगाम जोरात होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...